दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:43 AM2019-02-12T00:43:38+5:302019-02-12T00:44:47+5:30

शहर परिसरातील सीबीएस व मुंबई नाका परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकरोड येथून दुचाकी लंपास करण्यात आली होती. तसेच सरकारवाडा पोलिसांच्या हद्दीतूनही काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या.

Theft of a two-wheeler | दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच

दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच

Next

नाशिक : शहर परिसरातील सीबीएस व मुंबई नाका परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकरोड येथून दुचाकी लंपास करण्यात आली होती. तसेच सरकारवाडा पोलिसांच्या हद्दीतूनही काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घटना घडल्या आहेत. शहरात दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच असल्याने नाशिककरांना रस्त्यावर वाहने
उभी करणेदेखील धोक्याचे झाले आहे.
पहिल्या घटनेत सोमनाथ हरिभाऊ पिंगळे (रा. देवी मंदिराजवळ, मखमलाबाद) यांची ४० हजार रु पयांची प्लेझर (एम.एच. १५ सीपी ४२२२) सीबीएसजवळील भुयारी मार्गाच्या वाहनतळामधून अज्ञात चोरट्यांनी पळवून
नेली. तसेच दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी द्वारका येथील नासर्डी पुलाजवळ असलेल्या बनकर मळा भागातील सोसायटीच्या वाहनतळातून ४० हजार रु पयांची पॅशन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली आहे.
येथील झेप अपार्टमेंटमध्ये स्वप्नील रमेश वारे हे राहतात. त्यांनी त्यांच्या सोसायटीच्या वाहनतळात दुचाकी (एम.एच.१५ बीझेड १५१३) नेहमीप्रमाणे उभी केली होती.
शहर व परिसरात दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही टोळी शोधून काढावी, असे आवाहन केले जात आहे. शहरातून राजरोसपणे इमारतींच्या वाहनतळातून तसेच गजबजलेल्या परिसरातून दुचाकी पळवून नेल्या जात असताना पोलिसांकडून जुगारी शोधून त्यांच्यावर थातूरमातूर कारवाई केली जात आहे.
घरफोडीत ३९ हजारांचा ऐवज लंपास
नाशिक : सातपूर कॉलनीतील बळवंतनगर भागात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत घरामधून ३९ हजार रु पयांचा मुद्देमाल लांबविला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील आनंदछाया सहकारी गृहनिर्माण सोसायटीत भानुदास जगन्नाथ महांगडे हे राहतात.
या आठवड्यात त्यांचे बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातून ३० हजार रु पयांच्या सोन्याच्या अंगठ्या, आठ हजार रु पयांचे चांदीचे कमरपट्टे, चांदीची थाळी, वाळा, एक हजार रुपयाची रोकड असा ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे त्यांनी फिर्यादित म्हटले आहे.
याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Theft of a two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.