लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, सोमवारी (दि.१९) पहिल्याच दिवशी दहा इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा न्यायालयात नाशिक बार असोसिएशनचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. असोसिएशनच्या संचालक मंडळातील अकरा पदांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. असोसिएशनचे सुमारे तीन हजार मतदार आहेत. या निवडणुकीसाठी ११ जुलै रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्र ी व स्वीकृतीस प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत ४३ अर्जांची विक्री झाली आहे. सचिव पदासाठी धर्मेंद्र चव्हाण, खजिनदार पदासाठी लीलाधर जाधव, सहसचिव पदासाठी प्रवीण साळवे, शामला दीक्षित, मंगला शेजवळ, विजया माहेश्वरी यांनी अर्ज दाखल केले आहेत. महिला सदस्य पदासाठी एक अर्ज दाखल झाला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही.