‘बीएलओ’चे काम करण्यास शिक्षकांनी दिला नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:37 AM2018-12-17T00:37:42+5:302018-12-17T00:38:12+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना इतर अशैक्षणिक (बीएलओ)ची कामे देऊ नयेत अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

Teachers refused to do 'BLO' work | ‘बीएलओ’चे काम करण्यास शिक्षकांनी दिला नकार

शिक्षकांना इतर अशैक्षणिक (बीएलओ)ची कामे देऊ नयेत या मागणीचे निवेदन तहसीलदार शरद घोरपडे यांना देताना महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक-शिक्षकेतर सेनेचे प्रकाश सोनवणे, प्रकाश वाघ, दिलीप भामरे, अशोक भामरे, बाबाजी पवार, बी. एम. निकम, वासुदेव बधान, रघुनाथ हळदे, सुभाष पवार आदी.

Next

सातपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना इतर अशैक्षणिक (बीएलओ)ची कामे देऊ नयेत अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक-शिक्षकेतर सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच केंद्र शासनाचा बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा हक्क, तसेच शासनाच्या निर्णयानुसार शैक्षणिक कामाव्यतिरिक्त शिक्षकांना इतर अशैक्षणिक कामे देऊ नयेत. तरीही शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादल्यास सर्व शिक्षकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रकाश सोनवणे, प्रकाश वाघ, दिलीप भामरे, अशोक भामरे, बाबाजी पवार, बी. एम. निकम, वासुदेव बधान, रघुनाथ हळदे, सुभाष पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
अशैक्षणिक कामांसाठी नेमणुकीस प्रतिबंध
केंद्र शासनाच्या शिक्षण हक्क कायदानुसार प्रत्यक्ष जनगणना, निवडणुका याखेरीज इतर कुठल्याही अशैक्षणिक कामांसाठी शिक्षकांना नेमणुकीस प्रतिबंध केलेला आहे, तरी सुद्धा शिक्षकांना बीएलओचे काम दिलेले आहे. हे काम त्वरित रद्द करण्यात यावे असे शिक्षकांनी सांगीतले.

Web Title: Teachers refused to do 'BLO' work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.