इगतपुरी रेल्वेस्थानकावर तोतया टीसीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:27 AM2018-11-24T01:27:38+5:302018-11-24T01:27:58+5:30

इगतपुरी येथील रेल्वेस्थानकात लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी मंगला एक्स्प्रेसमध्ये असलेल्या एका तोतया टीसीला अटक केली. त्याच्यावर इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Tcila arrested on Igatpuri railway station | इगतपुरी रेल्वेस्थानकावर तोतया टीसीला अटक

इगतपुरी रेल्वेस्थानकावर तोतया टीसीला अटक

Next

इगतपुरी : येथील रेल्वेस्थानकात लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी मंगला एक्स्प्रेसमध्ये असलेल्या एका तोतया टीसीला अटक केली. त्याच्यावर इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
इगतपुरी रेल्वेस्थानकात मंगला एक्स्प्रेस आली असता गाडीच्या पुढच्या जनरल डब्यात रेल्वे सुरक्षा बलाचे विकास साळुंके हे गस्त घालत असताना त्यांना एक इसम टीसीसारखा गणवेश परिधान करून गाडीत तिकीट चेक करताना दिसून आला; मात्र त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने साळुंके यांनी लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचे सतीश खर्डे, गजानन जाधव, विशाल पाटील व इगतपुरीचे टीसी बी. बी. आहेर यांना तत्काळ डब्याजवळ बोलावून घेतले. त्यानंतर सदर तोतया टीसी शंकर तातेराम शितोळे (३२) याची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ खोटा बिल्ला सापडला.
तो पांढऱ्या रंगाचा शर्ट घालून, हातात पावती पुस्तक, गळ्यात क्रॉस बॅग घेऊन तिकीट चेक करीत असल्याचे आढळून आले. त्याच्याविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाचे विकास साळुंके यांनी फिर्याद नोंदविली असून, त्याच्यावर भादंवि कलम १७०, १७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तो बुलडाणा येथील रहिवासी असल्याचे आढळून आले.

अधिक तपास इगतपुरी लोहमार्ग पोलीसचे सहायक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव करीत आहेत.

Web Title: Tcila arrested on Igatpuri railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.