दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली की मृत्यूचा सापळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:10 AM2018-05-15T01:10:45+5:302018-05-15T01:10:45+5:30

दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली असून, आठवडाभरात रात्रीच्या वेळी किमान दोन ते तीन गंभीर अपघात या ठिकाणी होत आहेत़ या ठिकाणी असलेली सिग्नल यंत्रणा रात्रीच्या वेळी बंद असल्याने वाहनधारक सुसाट असतात़ त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम, क़ का़ वाघ महाविद्यालय या ठिकाणी ज्याप्रमाणे गतिरोधक टाकलेले आहेत तसे टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़

 Tarvalnagar Chowpule or the death trap on Dindori Road! | दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली की मृत्यूचा सापळा !

दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली की मृत्यूचा सापळा !

Next

नाशिक : दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली असून, आठवडाभरात रात्रीच्या वेळी किमान दोन ते तीन गंभीर अपघात या ठिकाणी होत आहेत़ या ठिकाणी असलेली सिग्नल यंत्रणा रात्रीच्या वेळी बंद असल्याने वाहनधारक सुसाट असतात़ त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम, क़ का़ वाघ महाविद्यालय या ठिकाणी ज्याप्रमाणे गतिरोधक टाकलेले आहेत तसे टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़  तारवालानगर चौफुलीवर शुक्रवारी (दि़११) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मार्केट यार्डाकडून भरधाव आलेल्या एस.क्रॉस (एमएच १५, जीए ५६५७) या वाहनचालकाने दिलेल्या जबर धडकेत वॅगनआर कार (एमएच ४३, ए ८९०६) उलटली व सुमारे पंधरा फूट घसरत गेली़ सुदैवाने या अपघातात वॅगन आरमधील महिला व लहान मुलांना किरकोळ दुखापत झाली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात उत्तमराव देवरे (रा़ मातोश्रीनगर, विजयनगर, देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार एसक्रॉसवरील वाहनचालकाच्या विरोधात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दिंडोरी रोडवरील तारवालानगर चौफुलीवर अमृतधाम चौफुलीकडून येणारे, दिंडोरीरोड, मार्केट यार्ड तसेच नाशिककडून म्हसरूळ दिंडोरी रोडकडे वाहने जातात़ या ठिकाणी महापालिकेने सिग्नल यंत्रणा बसविली असली तरी वाहनधारक सिग्नल सुटेपर्यंत प्रतीक्षादेखील करीत नाही़ या चौफुलीवर वाहतूक पोलीस हे केवळ दंडवसुलीसाठी नियुक्त केले आहेत की काय असे चित्र असते़ त्यामुळे या ़ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी तसेच मुंबई-आग्रा रोडवर एकाच ठिकाणी टाकलेले पाच-सहा एकत्रित गतिरोधक बसवावे जेणेकरून प्रत्येक वाहनधारक या ठिकाणी वाहनाचा वेग कमी करेल व अपघातांची संख्या कमी होईल़ तारवालानगर चौफुलीवर पूर्वी वळणरोड लहान असल्याने लावण्यात आलेली सिग्नल यंत्रणा तसेच वृक्षावर वाहने आदळल्याच्या घटना घडलेल्या असून, अनेकांचे जीवही गेलेले आहेत़ त्यानंतर रस्ता रुंदीकरण केल्यानंतर रात्रीच्या वेळी या चौफुलीवरून भरधाव वाहने धावत असल्यामुळे पादचारी व दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून चौफु ली पार करावी लागते़ या ठिकाणी स्थानिक मित्रमंडळाने सीसीटीव्ही यंत्रणाही बसविलेली आहे, याद्वारे किमान कोणत्या वाहनधारकाची चूक आहे हे पोलिसांच्या लक्षात येते़
विशेष म्हणजे याच रस्त्यावर नाशिक नगरीच्या महापौर दररोज ये-जा करतात़ मात्र, त्यांना तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनाही या अपघातप्रवण चौफुलीबाबत उपाययोजना करण्याबाबत सूचत नाही, याबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जाते आहे़

Web Title:  Tarvalnagar Chowpule or the death trap on Dindori Road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.