‘तंत्र’विश्वात रमले भावी अभियंते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 05:47 PM2018-09-19T17:47:33+5:302018-09-19T17:48:18+5:30

मनमाड: अभियांत्रीकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उद्याच्या विकसीत भारताचे कौशल्यसंपन्न अभियंते आहेत या भावनेतून संजिवनी अभियांत्रीकी महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी मनमाड येथील ब्रिटीश कालीन रेल्वे कारखाना अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते.तंत्रविश्वात रमलेल्या या भावी अभियंत्यांनी रेल्वे पुल बांधणीच्या विविध संकल्पना जाणून घेतल्या.

'Tantra' is a wonderful future engineer! | ‘तंत्र’विश्वात रमले भावी अभियंते!

‘तंत्र’विश्वात रमले भावी अभियंते!

Next

मनमाड: अभियांत्रीकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उद्याच्या विकसीत भारताचे कौशल्यसंपन्न अभियंते आहेत या भावनेतून संजिवनी अभियांत्रीकी महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी मनमाड येथील ब्रिटीश कालीन रेल्वे कारखाना अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते.तंत्रविश्वात रमलेल्या या भावी अभियंत्यांनी रेल्वे पुल बांधणीच्या विविध संकल्पना जाणून घेतल्या.
भेटी साठी आलेल्या या विद्यार्थ्यांचा रेल्वे कारखान्यातील आॅल इंडीया एससी एसटी रेल्वे एम्पलॉयीज असोशिएशनच्या वतीने नुकतेच झालेल्या अभियंता दिनाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या सत्कारामुळे भावी अभियंते सुध्दा भाराउन गेले.
संजिवनी महाविद्यालय कोपरगावाचे स्थापत्य अभियांत्रीकी विभाग प्रमुख डॉ. एम. एस पुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्ष स्थापत्य अभियांत्रीकच्या विद्यार्थ्यांसाठी मनमाड येथील रेल्वे कारखाना अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले होते.स्वातंत्र्यापुर्वी केवळ पुल बांधनी चे काम होणाºया या कारखान्यात आता पुलबांधनी बरोबरच रुळाखाली असनारे लोखंडी स्लिपर्स, रुळ बदलण्यासाठी लागणारे सांधे या सह अन्य सामग्री तयार करण्यात येते.प्रा. एन.एस नाईक, प्रा.एस. एम.घुमरे,प्रा. डी.डी. मोरे,प्रा.आर. व्ही कोल्हे,प्रा. आर. एस. राजगुरू यांनी विद्यार्थ्यांना कारखान्यातील रिबेटेड गर्डर, ओपन वेब गर्डर,वेल्डेड गर्डर ,विविध अकाराचे चॅनल्स सेक्शन यासह पुल बांधनीच्या संकल्पना समजाउन सांगीतल्या.
मनमाड कारखान्यातील आॅल इंडीया एससी एसटी असोशिएशनच्या वतीने भावी अभियंत्यांकडून देशाच्या विकासासाठी योगदान मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येउन सत्कार करण्यात आला. या वेळी असोशिएशनचे झोनल सचिव सतीश केदारे,शाखा सचिव सिध्दार्थ जोगदंड,प्रविण अहिरे, किरण अहिरे,सुनील सोनवणे,सागर गरूड, हर्षल सुर्यवंशी,विनोद खरे,राकेश ताठे,बबन कसबे,जितेंद्र खैरनार,सुरेश मीना,रुपेश साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: 'Tantra' is a wonderful future engineer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.