ममदापूर येथील टँकरच बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:05 AM2019-02-15T00:05:30+5:302019-02-15T00:23:45+5:30

येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, वाडी-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र गेल्या आठ दिवसांपासून टँकर गावात आला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

Tankarach missing in Mammadpur | ममदापूर येथील टँकरच बेपत्ता

ममदापूर येथील टँकरच बेपत्ता

Next
ठळक मुद्देमहिला आक्रमक : आठ दिवसांपासून नागरिकांचे हाल

ममदापूर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, वाडी-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र गेल्या आठ दिवसांपासून टँकर गावात आला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
यावर्षी पावसाने दडी मारल्याने पावसाळ्यातदेखील परिसरातील छोटे-मोठे बंधारे कोरडे होते तसेच विहिरींना पाणीच आले नाही. त्यामुळे परिसरातील ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी, रहाडी, सोमठाण जोश, कोळगाव, रेंडाळा आदी गावांना मागील बऱ्याच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे.
गावातील टँकर दररोज येतो मग वाडी वस्तीवरील का येत नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी व बोअरवेल दोन्हीही कोरडेठाक असल्याने शेतकºयांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण झाली आहे. या परिसरातील शेतकरी हे आपल्या शेतातच राहतात. दरवर्षी शेतकºयांना पिण्यासाठी पुरेल एवढे पाणी विहिरींना असायचे किंवा बोअरवेलला तरी पाणी शेतकºयांच्या कुटुंबाला व जनावरांना पिण्यासाठी असायचे; परंतु यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पिण्यासाठी पाणी नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे हाल होत आहे. त्यामुळे शासनाने गावाबरोबरच वाडी-वस्तीवरील शेतकºयांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.
टँकरचालकाची अरेरावी
टँकरचालक शेतकरी, महिला यांच्यावर अरेरावीची भाषा वापरून पाणी वाटप करताना प्रत्येकाशी हुज्जत घालतो अशी ओरड आहे. त्यामुळे सदर टँकर बदलून मिळावा अशी मागणी होत आहे. गावची लोकसंख्या विचारात घेता एका टँकरचे पाणी अपूर्ण पडत असल्याने वाडी-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत आहे.

Web Title: Tankarach missing in Mammadpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.