महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागातील  ‘सह्याजी’रावांवर कारवाई करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:51 AM2017-11-28T00:51:36+5:302017-11-28T00:52:00+5:30

महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागातील गलथान कारभारामुळे संपूर्ण सिडको भागात डेंग्यू तसेच साथीच्या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून, आरोग्य विभागात कामकाज करणारे सफाई कर्मचारी हे प्रत्यक्ष कामावर हजर न राहता महिन्याचा पगार घेत असल्याचे धक्कादायक वृत्त सोमवारी (दि.२७) ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्ताची नगरसेवकांनी प्रभाग सभेत दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाºयांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Take action against 'Sahyaji' in CIDCO health department of NMC! |  महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागातील  ‘सह्याजी’रावांवर कारवाई करा!

 महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागातील  ‘सह्याजी’रावांवर कारवाई करा!

Next

सिडको : महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागातील गलथान कारभारामुळे संपूर्ण सिडको भागात डेंग्यू तसेच साथीच्या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून, आरोग्य विभागात कामकाज करणारे सफाई कर्मचारी हे प्रत्यक्ष कामावर हजर न राहता महिन्याचा पगार घेत असल्याचे धक्कादायक वृत्त सोमवारी (दि.२७) ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्ताची नगरसेवकांनी प्रभाग सभेत दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाºयांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.  महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागात स्वच्छतेसाठी अगोदरच अत्यंत कमी कर्मचारी असताना याच विभागातील काही सफाई कर्मचारी हे सकाळी कामाच्या वेळेस हजर राहून हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करतात व यानंतर मात्र काम न करताच घरी जातात व पुन्हा कामकाजाची वेळ संपण्याच्या वेळी येऊन पुन्हा हजेरी लावत असल्याचा धक्कादायक प्रकार सिडको विभागात घडत आहे. अनेक कर्मचारी तर नगरसेवकांच्या वशिल्याने टेबल वर्क करतात. याबाबत लोकमतमध्ये वस्तुस्थिती मांडण्यात आली होती. त्याची दखल घेत नगरसेवकांनी प्रभाग सभेतच संबंधित अधिकाºयांनी विचारणा केली. आरोग्य विभागातील काही कर्मचारी महिन्यातील पंधरा-पंधरा दिवस कामावर हजर न राहता परस्पर त्यांच्या स्वाक्षºया घेतल्या जात असून, त्यांना संपूर्ण महिन्याचा पगार मिळत आहे. यात अधिकारी व कर्मचाºयांमध्ये आर्थिक तडजोडदेखील होत असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात डेंग्यूसदृश तसेच साथीचे आजार असलेल्या रुग्णसंख्येत वाढ झाली असतानाही आरोग्य विभाग मात्र सुस्तावलेलाच दिसत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. याबाबत सोमवारी प्रभाग सभेत नगरसेवक सुधाकर बडगुजर, चंद्रकांत खाडे, कल्पना पांडे, सुवर्णा मटाले आदींनी प्रश्न उपस्थित केला.  यावेळी नगरसेवकांनी, सिडको भागात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार वाढलेले असताना आरोग्य विभाग मात्र दुर्लक्ष करीत आहे. आरोग्य विभागातील सफाई कर्मचाºयांची संपूर्ण माहिती मिळावी तसेच या प्रकरणात दोषी असणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

Web Title: Take action against 'Sahyaji' in CIDCO health department of NMC!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.