ग्रामिण नव्हे तर चक्क शहरी भागात टवाळखोरांनी घेतला गलोलीद्वारे दहा पक्ष्यांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 07:07 PM2017-10-28T19:07:59+5:302017-10-28T19:13:01+5:30

पांडवनगरी परिसरातील बंगल्यांच्या आवारात सर्प निघाल्याचा ‘कॉल’ 'इको-एको'च्या सदस्यांना आला. भर दुपारी सर्प रेस्क्यू करण्यासाठी या भागात सदस्य दाखल झाले असता त्यांच्या सदर प्रकार निदर्शनास आला. झोपडपट्टी भागातील काही टवाळखोर अल्पवयीन मुलांचे टोळके हातात गलोल घेऊन शिकार करत असल्याचे दिसले.

 Tailored by the Galleys, not only in the rural areas but by the villagers, the tension of the ten birds | ग्रामिण नव्हे तर चक्क शहरी भागात टवाळखोरांनी घेतला गलोलीद्वारे दहा पक्ष्यांचा बळी

ग्रामिण नव्हे तर चक्क शहरी भागात टवाळखोरांनी घेतला गलोलीद्वारे दहा पक्ष्यांचा बळी

googlenewsNext
ठळक मुद्देअज्ञात टवाळखोरांविरुद्ध गुन्हा घटनास्थळी येऊन मृत पक्ष्यांचा पंचनामा वनविभागाच्या पश्चिम कार्यालयाने गंभीर दखल घेतली

नाशिक : इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी भागातील गल्ल्यांमध्ये फिरून  इवल्यासा जीव असलेल्या पक्ष्यांवर गलोलीने निशाणा साधत परिसरातील झोपडपट्टी भागातील टवाळखोरांनी शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वनविभागाच्या पश्चिम कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून, अज्ञात टवाळखोरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
पांडवनगरी परिसरातील बंगल्यांच्या आवारात सर्प निघाल्याचा ‘कॉल’ 'इको-एको'च्या सदस्यांना आला. भर दुपारी सर्प रेस्क्यू करण्यासाठी या भागात सदस्य दाखल झाले असता त्यांच्या सदर प्रकार निदर्शनास आला. झोपडपट्टी भागातील काही टवाळखोर अल्पवयीन मुलांचे टोळके हातात गलोल घेऊन शिकार करत असल्याचे दिसले. या संस्थेच्या स्वयंसेवकांनी तत्काळ प्रसंगावधान राखत त्या मुलांशी संवाद साधत त्यांना संशय येऊ दिला नाही. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत सुमारे दहा पक्षी मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. सदस्यांनी या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला कळविली. वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार व  पथक घटनास्थळी पोहचेपर्यंत टवाळखोरांनी सदस्यांच्या हातांना चावा घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, सोनार यांनी घटनास्थळी येऊन मृत पक्ष्यांचा पंचनामा केला असून, अज्ञात टवाळखोरांविरुद्ध वनविभागाच्या पश्चिम कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सोनार करीत आहेत.

Web Title:  Tailored by the Galleys, not only in the rural areas but by the villagers, the tension of the ten birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.