सोळा लाख विद्यार्थ्यांची कलचाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:56 AM2019-01-30T00:56:33+5:302019-01-30T00:56:55+5:30

दहावीतील विद्यार्थ्यांची आवड व त्यांचा विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रासोबतच कला कौशल्यांविषयीचा कल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या कलचाचणी परीक्षेला राज्यातील नऊ विभागांतून १६ लाख १ हजार ८८६ विद्यार्थी प्रविष्ट झाले.

 The tactics of sixteen lakh students | सोळा लाख विद्यार्थ्यांची कलचाचणी

सोळा लाख विद्यार्थ्यांची कलचाचणी

Next

नाशिक : दहावीतील विद्यार्थ्यांची आवड व त्यांचा विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रासोबतच कला कौशल्यांविषयीचा कल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या कलचाचणी परीक्षेला राज्यातील नऊ विभागांतून १६ लाख १ हजार ८८६ विद्यार्थी प्रविष्ट झाले.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह श्यामची आई फाउंडेशन व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागामार्फत १८ डिसेंबर २०१८ ते १७ जानेवारी २०१९ या कालावधीत दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी परीक्षा घेण्यात आली. संपूर्ण राज्यभरात घेतल्या जाणाऱ्या या कलचाचणीसाठी यावर्षी प्रथमच सर्वत्र मोबाइल अ‍ॅपचा वापर करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षकांसोबतच पालकांचेही या परीक्षेसाठी मार्गदर्शन मिळाल्याचे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे समुपदेशक किरण बावा यांनी सांगितले.
राज्यातील नऊ विभागांपैकी पुणे विभागातून २ लाख ६९ हजार २३४ विद्याथ्यांनी ही परीक्षा दिली, तर नागपूरमधून १ लाख ६१ हजार ७४६, औरंगाबादमधून १ लाख ८२ हजार २२८, मुंबईतून ३ लाख ४१ हजार ९०१, कोल्हापूरमधून १ लाख ३९ हजार ७९५, अमरावतीतून १ लाख ६६ हजार, २९६, नाशिकमधून १ लाख ९९ हजार ५३४, लातूरचे १ लाख ६ हजार ६२२ व कोकणातून ३४ हजार ५३० असे एकूण १६ लाख १ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी कल चाचणी परीक्षा दिली.

Web Title:  The tactics of sixteen lakh students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.