स्वित्झर्लंड सरकार बदलणार नाशिकची हवा! वायुप्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 02:58 AM2019-05-17T02:58:12+5:302019-05-17T02:58:28+5:30

येथील हवा-पाणी उत्तम असल्याचा दाखला नेहमीच दिला जातो. परंतु आत प्रदूषित वायूच्या क्रमवारीत नाशिक शहराचा क्रमांक देशात सतरावा आहे.

Switzerland will change the government of Nashik! Try to avoid air pollution | स्वित्झर्लंड सरकार बदलणार नाशिकची हवा! वायुप्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न

स्वित्झर्लंड सरकार बदलणार नाशिकची हवा! वायुप्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न

Next

नाशिक : येथील हवा-पाणी उत्तम असल्याचा दाखला नेहमीच दिला जातो. परंतु आत प्रदूषित वायूच्या क्रमवारीत नाशिक शहराचा क्रमांक देशात सतरावा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ‘क्लीन एअर सीटी’ प्रकल्पाअंतर्गत राज्यातून नाशिक आणि पुण्याची निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत स्वीत्झर्लंड सरकारच्यावतीने नाशिकमध्ये कृती आराखडा राबविण्यात येणार असून, नाशिकची हवा शुद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
महाराष्टÑ राज्य प्रदूषण महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात यासंदर्भात बुधवारी बैठक झाली. त्यास अर्थ सायन्स अ‍ॅण्ड क्लायमेट चेंजेस डिव्हीजन टेरीचे संचालक सुमित शर्मा तसेच थेमेटिक अ‍ॅडव्हायर एनर्जीचे वरिष्ठ अधिकारी आनंद शुक्ला उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रदूषणकारी हवामापन आणि ती बदलण्यासाठीच्या योजनांचे प्राथमिक सादरीकरण केले आणि महापालिकेत आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेटदेखील घेतली.
हवा प्रदूषणाच्या बाबतीत दिल्ली, मुंबईसारखी महानगरे गंभीर अवस्थेत आहेत. त्याठिकाणी जागतिक संस्थांच्या मदतीने उपाययोजना केल्या जात असल्या, तरी आता नाशिक-पुण्यासारखी शहरे वाचविण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे.
‘एचडीसी’ या संस्थेच्या माध्यमातून नाशिक शहरात काय करता येईल. यासंदर्भातील आराखडा महिनाभरात शासनाला, तसेच महापालिकेलाही सादर करण्यात येणार आहे.

एजन्सी करणार अभ्यास
वाहनातून बाहेर पडणारा प्रदूषित वायू, कचरा जाळणे आणि बांधकाम करतानाचे धुलीकण यामुळे प्रामुख्याने वायू प्रदूषण होत असते. नाशिक शहरातील याच समस्येवर ‘एचडीसी’ एजन्सी अभ्यास करणार आहे.

Web Title: Switzerland will change the government of Nashik! Try to avoid air pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.