‘स्वरसाधना’ मैफल रंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:08 AM2019-04-26T01:08:19+5:302019-04-26T01:08:37+5:30

जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेत स्वरसाधना संगीत गायिका स्वराली जोशी यांनी शास्त्रीय रागाबरोबरच गझल, भजन व अभंग सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

 'Swarasadhana' concert played | ‘स्वरसाधना’ मैफल रंगली

‘स्वरसाधना’ मैफल रंगली

Next

नाशिकरोड : जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेत स्वरसाधना संगीत गायिका स्वराली जोशी यांनी शास्त्रीय रागाबरोबरच गझल, भजन व अभंग सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
गुरूवर्य पंडित शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे स्वरसाधना मासिक संगीत मासिक सभेचे उद्घाटन पुण्याच्या गायिका स्वराली जोशी, पंडित शंकरराव वैरागकर, संतोष जोशी, प्रकाश पाटील, श्रीकांत कुलकर्णी, प्रा. देवधर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.
यावेळी गायिका स्वराली जोशींनी ठुमरीचा प्रकार दादरा सादर केला. ये मोहब्बत ही गझल व त्यानंतर विष्णुमयवाले राम.. हे भजन सादर केले. कैसे दिन कठीण.. ही राग पुरिया धनश्रीमधील बंदिश तसेच मुश्काली करो आसन.. ही दुर्गा रागातील बंदिश सादर केली. यावेळी संवादिनीवर सागर कुलकर्णी आणि तबल्यावर ओंकार वैरागकर यांनी साथ दिली. शुभांगी देवधर यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक सरिता वैरागकर यांनी केले.

Web Title:  'Swarasadhana' concert played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.