संगणकावर पत्ते खेळणारा कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:56 AM2018-05-22T00:56:11+5:302018-05-22T00:56:11+5:30

नाशिक : कार्यालयीन वेळेत संगणकावर पत्ते खेळणाऱ्या एका वरिष्ठ सहायकास मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी रंगेहाथ पकडल्याने संबंधिताला तत्काळ निलंबित करण्यात आले. संबंधित अधिकारी संगणकावर पत्ते खेळत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी गिते हे त्याच्या मागे तब्बल २० मिनिटे उभे राहून सारा प्रकार पाहत होते.

Suspend the player who leaves the card on the computer | संगणकावर पत्ते खेळणारा कर्मचारी निलंबित

संगणकावर पत्ते खेळणारा कर्मचारी निलंबित

Next
ठळक मुद्दे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या शरणपूररोड येथील कार्यालयास अचानक भेट

नाशिक : कार्यालयीन वेळेत संगणकावर पत्ते खेळणाऱ्या एका वरिष्ठ सहायकास मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी रंगेहाथ पकडल्याने संबंधिताला तत्काळ निलंबित करण्यात आले. संबंधित अधिकारी संगणकावर पत्ते खेळत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी गिते हे त्याच्या मागे तब्बल २० मिनिटे उभे राहून सारा प्रकार पाहत होते.
शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या शरणपूररोड येथील कार्यालयास अचानक भेट दिली. यावेळी कार्यालयातील वरिष्ठ सहायक आर. के. गांगुर्डे हे कार्यालयीन कामकाजा ऐवजी संगणकावर चॅनल लावून बातम्या बघत असल्याचे व संगणकावरच त्याने पत्त्याचा डाव मांडल्याचे आढळून आले.
या कामात व्यस्त असलेल्या गांगुर्डे यांना गिते हे कार्यालयात आल्याचे व आपल्या मागे बसून असल्याचे लक्षातही आले नाही. याबाबत डॉ. गिते यांनी त्वरित सदर अधिकाºयास निलंबित करण्याचे आदेश दिले. जिल्हा परिषदेतील कामकाजातील दिरंगाई अनेकदा चर्चेत आली आहे.


दफ्तर दिरंगाईचा कायदा, असो की पेंडंसीबाबतचे नियम. हे सारे डावलून कर्मचाºयांकडून कामचुकारपणा सुरूच असतो. जागेवर उपस्थित न राहणे, आलेल्या अभ्यागतांना न भटणे किंवा त्यांना वारंवार चकरा मारावयास भाग पाडणे असे प्रकार सातत्याने घडत असतात. कार्यालयाीन कर्मचारीदेखील ऐकमेकांना सांभाळून घेण्याची भूमिका घेतात. एखादी अधिकारी, कर्मचारी जागेवर नसला की इतरांची ठरलेली उत्तरे तयार असतात मात्र संबंधितांचा फोन नंबर कधीच दिला जात नाही. कर्मचाºयांच्या या साखळीमुळे सर्वसामान्यांना मात्र त्रास होता. या कारवाईमुळे अशा मानसिकतेतील अधिकाºयांना नक्कीच चाप बसेल असे बोलले जात आहे.

Web Title: Suspend the player who leaves the card on the computer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.