फ्रीस्टाइल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुप्रिया तुपेला रौप्य पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 05:30 PM2019-06-26T17:30:57+5:302019-06-26T17:34:19+5:30

सिन्नर :  तालुक्यातील बेलू येथील सुप्रिया बहिरू तुपे या महिला कुस्तीपटूने कोटा (राजस्थान) येथे झालेल्या पंधरा वर्षाखालील फ्रीस्टाइल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ६२ किलो वजनी गटात सिल्व्हर मेडल प्राप्त केले.

 Supriya Tupela silver medal for freestyle national wrestling championship | फ्रीस्टाइल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुप्रिया तुपेला रौप्य पदक

फ्रीस्टाइल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुप्रिया तुपेला रौप्य पदक

Next

सुप्रिया तुपे ही गुरू हनुमान आखाडा साकूर फाटा येथे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू ज्ञानेश्वर शिंदे यांच्याकडून कुस्तीचे डावपेच शिकत आहे. २ जून रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने जोग महाराज व्यायाम शाळा, आळंदी (देवाची) येथे घेण्यात आलेल्या चाचणी स्पर्धेत ६२ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवल्याने तिची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली होती. दि. २१ ते २३ जून रोजी कोटा (राजस्थान ) येथे राजस्थान कुस्ती संघाच्यावतीने पंधरा वर्षाखालील फ्रीस्टाइल व ग्रिको-रोमन स्टाइल मुले व मुली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा २०१९ घेण्यात आली. या स्पर्धेत सुप्रिया तुपेने पंजाब, दिल्ली, राजस्थान येथील महिला कुस्तीपटूंचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. हरियाणा येथील महिला कुस्तीपटू सोबत झालेल्या अंतिम लढतीत सुप्रियाला सिल्व्हर मेडल मिळाले. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या हस्ते तिला पदक देण्यात आले. तिला महाराष्ट्र कुस्ती संघाचे प्रशिक्षक किरण मोरे, नाशिक शहर तालीम संघाचे अध्यक्ष संजय चव्हाण, सचिव हिरामण वाघ, ज्ञानेश्वर शिंदे, नूतन शाळेचे कार्यवाहक मधुसूदन गायकवाड, वडील बहिरू तुपे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title:  Supriya Tupela silver medal for freestyle national wrestling championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य