मालेगावच्या रुग्णाची नाशकात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:08 AM2019-01-13T00:08:21+5:302019-01-13T01:43:18+5:30

मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेले रहिमखान नबीखान पठाण (५२) हे उपचारासाठी शुक्रवारी (दि.११) शहरातील शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी (दि.१२) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी तिसºया मजल्यावरील कक्षाची काच फोडून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.

Suicides in Malegaon's Patient's Nurse | मालेगावच्या रुग्णाची नाशकात आत्महत्या

मालेगावच्या रुग्णाची नाशकात आत्महत्या

Next
ठळक मुद्देडायलिसिस सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी

नाशिक : मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेले रहिमखान नबीखान पठाण (५२) हे उपचारासाठी शुक्रवारी (दि.११) शहरातील शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी (दि.१२) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी तिसºया मजल्यावरील कक्षाची काच फोडून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत माहिती अशी, रहिमखान हे मालेगावमधील गुलशननगर येथील रहिवासी असून, त्यांना मूत्रपिंडाचा विकार असल्यामुळे उपचारासाठी संदर्भ सेवा रुग्णालयात नातेवाइकांनी शुक्रवारी दाखल केले होते. शुक्रवारी त्यांच्यावर एक डायलिसिसची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत सुधार होऊ लागली होती, असे डॉक्टरांनी सांगितले. उपचाराचा भाग म्हणून शनिवारी े डायलिसिस करण्यासाठी त्यांना अतिदक्षता विभागातून कक्षात दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हलविण्यात आले. डायलिसिसची प्रक्रिया सुरू होऊन तीन तास उलटले होते; मात्र अचानकपणे रहिमखान यांनी संतापून डायलिसिस प्रक्रिया बाधित केली आणि खिडकीजवळील रुग्णाच्या खाटेवर चढून डोक्याने जोराची धडक मारून खिडकीची काच फोडली व तेथून खाली उडी घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
तिसºया मजल्यावरून उडी घेतल्याने रहिमखान गंभीर जखमी झाले होते. ही घटना लक्षात येताच सुरक्षारक्षक व डॉक्टरांनी धाव घेऊन त्यांना जखमी अवस्थेत उचलून तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल केले व उपचारास सुरुवात केली; मात्र जबर मार व रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
आजारपणाला कंटाळूनच त्यांनी अशाप्रकारे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Suicides in Malegaon's Patient's Nurse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.