जिल्ह्यातील कंधाणे, उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:21 AM2018-08-22T01:21:49+5:302018-08-22T01:23:01+5:30

नापिकी, शेतमालाचे कोसळणारे बाजारभाव व कर्जाचा बोजा यामुळे जिल्ह्यातील कंधाणे आणि उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, उत्राणे येथील पस्तीसवर्षीय शेतकºयाने कर्जमाफीसह मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्येतून जीवन संपवत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

Suicides by farmers in Kandana, Uttaranchal district | जिल्ह्यातील कंधाणे, उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या

जिल्ह्यातील कंधाणे, उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या

Next

नाशिक : नापिकी, शेतमालाचे कोसळणारे बाजारभाव व कर्जाचा बोजा यामुळे जिल्ह्यातील कंधाणे आणि उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
दरम्यान, उत्राणे येथील पस्तीसवर्षीय शेतकºयाने कर्जमाफीसह मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्येतून जीवन संपवत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. कंधाणे (ता. बागलाण) येथील शेतकरी बापू सीताराम बिरारी यांनी विष  प्राशन करून जीवनयात्रा संपवली. बिरारी यांच्या नावे सोसायटीचे तीन लाखांचे  कर्ज आहे. गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे अडकवलेले भांडवल व येणारे उत्पादन यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने शेती करणे जिकिरीचे झाले होते. यातच शेतमालाच्या बाजारभावातील अस्थिरता ह्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेपासूनही वंचित राहिल्याने बिरारी सतत कर्जफेडीच्या विंवचनेत राहत होते. रविवारी (दि.१९) त्यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. घरातील सदस्यांचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ सटाणा येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.  उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, वडील असा परिवार आहे. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सटाणा : शेतीसाठी बँक कर्ज देत नसल्याने नैराश्य आलेल्या बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील पस्तीस वर्षीय शेतकºयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. २१) दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.  प्रवीण कडू पगार असे या शेतकºयाचे नाव आहे. नोकरी मिळत नाही म्हणून शेती विकिसत करण्यासाठी प्रवीणची धडपड सुरू होती. साक्र ी तालुक्यातील म्हसदी येथील बँकेत त्याने शेतीसाठी कर्ज प्रकरण केले. अनेकवेळा त्याने बँकेत हेलपाटे मारले; मात्र ऐनवेळी बँकेच्या अधिकाºयांनी कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे प्रवीणला नैराश्य आले. त्यातूनच प्रवीण सकाळी अचानक घरातून निघून गेला. घरी जेवणासाठी वाट बघणाºया आई-वडिलांनी दुपारचे तीन वाजले तरी प्रवीण घरी न आल्याने शोधाशोध केली असता एका शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह तरंगतांना आढळून आला.
जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवीणचा मृतदेह विहिरीतून काढला. पोलिसांना प्रवीणच्या खिशात चिठ्ठी सापडली असून, त्यात आत्महत्येचे कारण दिलेले आहे. साक्र ी तालुक्यातील म्हसदी येथील बँकेने कर्ज दिले नाही म्हणून आपण जीवनयात्रा संपवत असल्याचे त्याने नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गुरव यांनी पंचनामा केला. घटनास्थळी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी भेट दिली. जायखेडा पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Web Title: Suicides by farmers in Kandana, Uttaranchal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.