मद्याच्या नशेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:32 PM2018-12-15T22:32:12+5:302018-12-15T22:32:58+5:30

नाशिक : घरातील पंख्यास गळफास घेऊन २९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़१४) सकाळच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीतील संजीवनगरमध्ये घडली़ विनोद प्रसाद (रा.भवानी रो हाऊस,संजीवनगर) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़

Suicide by taking a drunken youth | मद्याच्या नशेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मद्याच्या नशेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next
ठळक मुद्देपंख्यास गळफास ; अकस्मात मृत्युची नोंद

नाशिक : घरातील पंख्यास गळफास घेऊन २९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़१४) सकाळच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीतील संजीवनगरमध्ये घडली़ विनोद प्रसाद (रा.भवानी रो हाऊस,संजीवनगर) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़

कारमधून गोवंशीय मांस जप्त
नाशिक : कोकणीपुरा परिसरात संशयास्परित्या उभ्या असलेल्या ओम्नी कारमधून (एमएच १५, ईबी ८७६२) भद्रकाली पोलिसांनी १ हजार १५० रुपये किमतीचे ३० किलो गोवंशीय मांस शुक्रवारी (दि़१४) सकाळच्या सुमारास जप्त केले़ या प्रकरणी अल्ताफ मुश्ताक शेख (२९, रा. पंचशीलनगर, भद्रकाली) या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर प्राणीसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीस्वारांनी मोबाईल चोरला
नाशिक : गिरणीत दळण घेऊन गेलेल्या इसमाने बाहेरील बाकावर ठेवलेला महागडा मोबाईल पल्सर दुचाकीवरील दोघा संशयितांनी चोरून नेल्याीची घटना गुरुवारी रात्री पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडीयमजवळ घडली़ या प्रकरणी जितेद्र कार्लेकर (३६ रा.सनराईज अपा, कमलनगर) यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

बुलेटची चोरी
नाशिक :- सिडकोतील आषाढ सेक्टरमधील रहिवासी योगेश ठाकरे (हंसनी निवास) यांची ५० हजार रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड बुलेट (एमएच १५ एफबी ९१००) चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

दुचाकीची चोरी
नाशिक : दिंडोरी रोडवरील गोरक्षनगरमधील गणेश बैरागी (सूरशक्ती अपार्टमेंट) यांची १० हजार रुपये किमतीची लाल व काळ्या रंगाची सीडी डीलक्स दुचाकी (एमएच १५, सीयु ५१५८) चोरट्यांनी त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Suicide by taking a drunken youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.