नांदगाव तालुक्यातील शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:12 AM2017-08-23T01:12:23+5:302017-08-23T01:12:28+5:30

तालुक्यातील चांदोरा येथील नामदेव ओंकार पवार (५८) या शेतकºयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकºयाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी न्यावा. यासाठी शासकीय वाहन मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी मृतदेहच ट्रँक्टरमधून थेट तहसील कार्यालयात आणला.

 Suicide of Farmer in Nandgaon Taluka | नांदगाव तालुक्यातील शेतकºयाची आत्महत्या

नांदगाव तालुक्यातील शेतकºयाची आत्महत्या

Next

नांदगाव : तालुक्यातील चांदोरा येथील नामदेव ओंकार पवार (५८) या शेतकºयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकºयाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी न्यावा. यासाठी शासकीय वाहन मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी मृतदेहच ट्रँक्टरमधून थेट तहसील कार्यालयात आणला. अखेरीस रुग्णवाहिका देण्यास नकार देणाºया आरोग्य केंद्रातील संबंधितांची चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. सायंकाळी उशिरा शेतकºयाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  मयत नामदेव यांच्यावर मध्यम मुदतीचे २२ हजार तर चांदोरे सोसायटीचे दोन लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात पत्नी,आई दोन मुले, पाच मुली असा परिवार आहे. नामदेव पवार हे घटनेच्या दिवशी पहाटे घरातून निघून गेले त्यांचा गावात सर्वत्र शोध घेण्यात आल्या नंतर गावठाणातील समशानभूमी जवळ असलेल्या विहिरीबाहेर गोधडी व चपला दिसल्या अधिक शोध घेतला असता नामदेव यांचा गाळात रु तलेला मृतदेह आढळून आला. दुपारी बारा वाजेपासून ग्रामस्थ पोलीस व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रु ग्णवाहिकेची प्रतीक्षा करीत होते. मात्र पोलीस घटनास्थळी उशिरा आल्याचा आरोप गावकºयांनी केला. पिंपरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रु ग्णवाहिका वारंवार मागणी करून हि ती देण्यास नकार देण्यात आल्याने शेवटी नांदगावला शव विच्छेदनासाठी मयत शेतकºयाचा मृतदेह ट्रँक्टर वर थेट तहसील कार्यालयातच आणण्यात आला. त्यानंतर प्रशासनाची एकच धावपळ उडाली. निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी यांनी गट विकास अधिकारी जगनराव सूर्यवंशी याना पाचारण केले. तालुक्यातील पिंपरखेड आरोग्य केंद्रातील अनागोंदी बद्दल गेल्याच महीन्यात टाळे लावण्यात आले होते. याकडे ग्रामस्थांनी सुर्यंवशी यांचे लक्ष वेधले आपला अहवाल आपण मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाºयांना पाठविणार आहोत या त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवीत मृतदेह नंतर ग्रामीण रु ग्णालयात हलविण्यात आला.
आत्महत्यांची पंचाहत्तरी
नाशिक : शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, जिल्ह्यात एका आठवड्यात तिघा कर्जबाजारी शेतकºयांनी जीवनयात्रा संपविल्याने आजवर आत्महत्या करणाºया शेतकºयांनी पंचाहत्तरी गाठली आहे. जिल्ह्यात चालू वर्षी दर महिन्याला सरासरी सात शेतकरी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या करीत असून, शासनाने जुलै महिन्यात शेतकºयांचे दीड लाखापर्यंत कर्ज माफ तसेच त्यांना खरीप पिकांसाठी अनुदान देण्याची घोषणा केल्यानंतर आत्महत्यांचे प्रमाण घटण्याची शक्यता होती, तथापि ती फोल ठरली आहे.
जुलै महिन्यात सात शेतकºयांनी आत्महत्या केल्यानंतर आॅगस्ट महिन्यातही तोच कित्ता कायम आहे. गेल्या आठवड्यात मालेगाव व नांदगाव तालुक्यातील तीन शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. मालेगाव तालुक्यातील शिरसोंडी येथे राहणाºया योगेश नानाजी बोरसे यांनी विहिरीत उडी घेऊन, तर तालुक्यातील कंक्राळे येथील संतोष संपत दासनूर यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. संतोष दासनूर यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून उपचार केले जात होते, परंतु अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी नांदगाव तालुक्यातील चांदोरा येथील नामदेव ओमकार पवार (५५) या शेतकºयाने स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ७५ च्या घरात पोहोचली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत ८६ शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती.

Web Title:  Suicide of Farmer in Nandgaon Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.