नातेवाइकाला भेटण्यासाठी आलेल्या दोघा जणांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:15 AM2019-04-26T00:15:30+5:302019-04-26T00:17:00+5:30

पंचवटी : दवाखान्यात दाखल असलेल्या नातेवाइकाला भेटण्यासाठी आलेल्या दोघा जणांना मागील भांडणाची कुरापत काढून बेदम मारहाण केल्याची घटना सकाळी ...

Suffering the two people who came to meet the relative | नातेवाइकाला भेटण्यासाठी आलेल्या दोघा जणांना बेदम मारहाण

नातेवाइकाला भेटण्यासाठी आलेल्या दोघा जणांना बेदम मारहाण

Next

पंचवटी : दवाखान्यात दाखल असलेल्या नातेवाइकाला भेटण्यासाठी आलेल्या दोघा जणांना मागील भांडणाची कुरापत काढून बेदम मारहाण केल्याची घटना सकाळी नवीन आडगाव नाक्यावरील अपोलो रुग्णालयासमोर घडली आहे. या घटनेत दोघेजण जखमी झाले असून, मारहाण करणाऱ्या ओझर येथील दोघा संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणप्रकरणी विजयनगर सुरभी अपार्टमेंट येथे राहणाºया मोहम्मद अहमद शेख (५१) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. शेख हे पत्नी, त्यांचे जावई असे मुलगी अलम हिस भेटण्यासाठी आले असता ओझर येथील चांदणी चौकातील संशयित आरोपी अदिल अकबर शेख व त्याचा भाऊ अन्वर शेख यांनी मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण करून हातातील दगडाने रिझवान शेख यांच्या डोक्यात दगड मारून दुखापत केली आणि दम दिला.
तळेनगरला मोबाइल हिसकावला
अशोकस्तंभाकडून रामवाडीत घराकडे जाणाºया महिलेच्या हातातून पाच हजार रु पये किमतीचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. काल बुधवारी (दि.२४) रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली आहे. याबाबत मंगल कृष्णा बागुल (२३) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. बागुल या बुधवारी रात्री घराकडे पायी चालत जाताना काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयित आरोपींनी तळेनगर हिंदुस्तान फूड दुकानासमोर गाडी हळू करून हातातील मोबाइल बळजबरीने हिसकावून नेला. बागुल यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत संशयित पसार झाले होते. याबाबत जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे तपास करीत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Suffering the two people who came to meet the relative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.