नळवाडीच्या उपसरपंचपदी सुदाम दराडे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:55 PM2018-02-27T23:55:50+5:302018-02-27T23:55:50+5:30

नांदूरशिंगोटे : भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुदाम एकनाथ दराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Sudam Darade unanimously elected as the Vice President of Nalwadi | नळवाडीच्या उपसरपंचपदी सुदाम दराडे बिनविरोध

नळवाडीच्या उपसरपंचपदी सुदाम दराडे बिनविरोध

Next

नांदूरशिंगोटे : भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुदाम एकनाथ दराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नळवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पार्वताबाई शिवाजी सहाणे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीत उपसरपंच निवडीची घोषणा करण्यात आली. उपसरपंच दीपक अशोक सहाणे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. रिक्त उपसरपंचपदाच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत सुदाम एकनाथ दराडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. दराडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून दत्तात्रय सहाणे यांची स्वाक्षरी होती. दराडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच सहाणे यांनी केली. बैठकीस ग्रामपंचायत सदस्य शांताबाई विठ्ठल दराडे, कमळाबाई निवृत्ती सानप, रोहिणी एकनाथ दराडे, विजया बाळासाहेब सहाणे, स्वाती दत्तात्रय माळी, ग्रामसेवक जयश्री हासे आदी उपस्थित होते. बिनविरोध निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला. नवनिर्वाचित उपसरपंच सुदाम दराडे व मावळते उपसरपंच दीपक सहाणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी दराडे, रामदास सहाणे, रावसाहेब दराडे, सूर्यभान सहाणे, माजी सरपंच सुभाष दराडे,योगेश दराडे, दत्तात्रय माळी, देवराम माळी, रामभाऊ दराडे, बाळासाहेब देशमुख, विकास सहाणे, शिवनाथ दराडे, बाळू सहाणे, भारत दराडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Sudam Darade unanimously elected as the Vice President of Nalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.