यशस्वी वकील घडण्यासाठी ‘म्यूट ट्रायल’ आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 01:40 AM2019-01-13T01:40:43+5:302019-01-13T01:41:01+5:30

न्यायालयीन प्रक्रियेत निर्णयप्रक्रिया अतिशय महत्त्वाची असून, तिचे ज्ञान वकिलांनाही असणे आवश्यक आहे. त्यामुळे विधि शाखेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमधून यशस्वी वकील घडण्याकरिता ‘ म्यूट ट्रायल’ उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजशेखर मनथा यांनी सांगितले.

A successful lawyer needs a 'mute trial' | यशस्वी वकील घडण्यासाठी ‘म्यूट ट्रायल’ आवश्यक

म्यूट ट्रायल व जजमेंट रायटिंग स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राजशेखर मनथा. व्यासपीठावर अ‍ॅड. जयंत जायभावे, डॉ. अस्मिता वैद्य, डॉ. मो. स. गोसावी, डॉ. सुधीर कोतवाल, अ‍ॅड. अनिल सिंग, अ‍ॅड. नितीन ठाकरे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देराजशेखर मनथा : एनबीटी विधि महाविद्यालयात राष्ट्रस्तरीय स्पर्धेचे उद््घाटन

नाशिक : न्यायालयीन प्रक्रियेत निर्णयप्रक्रिया अतिशय महत्त्वाची असून, तिचे ज्ञान वकिलांनाही असणे आवश्यक आहे. त्यामुळे विधि शाखेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमधून यशस्वी वकील घडण्याकरिता ‘ म्यूट ट्रायल’ उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजशेखर मनथा यांनी सांगितले.
एनबीटी विधि महाविद्यालय व डी. टी. जायभावे प्रतिष्ठान यांच्यातर्फे संयुक्तरीत्या तेराव्या राष्टÑस्तरीय म्यूट ट्रायल व जजमेंट रायटिंग स्पर्धेचे शनिवारी (दि. १२) राजशेखर मनथा यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना न्यायालयीन खटल्यांच्या कामकाजाविषयी माहिती मिळावी, एखादा खटला कसा हाताळावा या विषयीचा सराव व्हावा, साक्षीदारांची तपासणी कशी करावी, खटल्याचा निकाल कसा लिहावा, याविषयी माहिती मिळावी यासाठी आयोजित या राष्टÑस्तरीय म्यूट ट्रायल व जजमेंट रायटिंग स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी ट्रायल कोर्टामध्ये काम करण्यासाठी आवश्यक कौशल्यांविषयी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी या उपक्रमामुळे प्रत्यक्ष खटला चालवताना येणाऱ्या अडचणी कमी होतील, अशी ग्वाही दिली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. अनिल सिंग यांनी विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेत
सहभाग घेतल्यामुळे न्यायालयात प्रत्यक्ष काम करणे सहजासहजी शक्य आहे, असे सांगितले.
गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी डॉ. मो. स. गोसावी यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून
आदर्श वकील व्हावे, असे
उपस्थितांना आवाहन केले.
अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी स्पर्धेविषयी सखोल माहिती देत खटला चालविण्यासाठी आवश्यक कौशल्य अवगत करण्यासाठी बारा वर्षांपासून सदर उपक्रमाचे आयोजन केले जाते असल्याचे सांगितले.




प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन वासंती भूमकर यांनी केले.

Web Title: A successful lawyer needs a 'mute trial'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.