विद्यार्थ्यांना वाटली उकडलेली अंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 07:11 PM2019-07-17T19:11:51+5:302019-07-17T19:12:05+5:30

देवळा : तालुक्यातील देवपूर पाडे येथील ज्ञानेश्वर माउली माध्यमिक विद्यालयात पोषक आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी वाटण्यात आली.

Students think boiled eggs | विद्यार्थ्यांना वाटली उकडलेली अंडी

विद्यार्थ्यांना वाटली उकडलेली अंडी

Next
ठळक मुद्देदेवपूरपाडे विद्यालयात पोषक आहार योजनेतर्गत उपक्रम

देवळा : तालुक्यातील देवपूर पाडे येथील ज्ञानेश्वर माउली माध्यमिक विद्यालयात पोषक आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी वाटण्यात आली.
देवपूरपाडे येथील या विद्यालयात शालेय पोषक आहार योजनेंतर्गत इयत्ता ५ वी ते ८ वीच्या १०० विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून उकडलेल्या अंड्यांचे वाटप योजनेचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष अभिमन अहीरे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान शाकाहारी विद्यार्थ्यांना बिस्किट पुडे देण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक जे. यु. वाघ, शिक्षक एम. एन. जोंधळे, श्रीमती पी. डी. सोनवणे, डि. पी. देवरे, व्हि. टी. सोनवणे, पी. पी. कदम, पी. डि. सुर्यवंशी, एम. एस. आहिरे, बी. पी. देवरे आदी उपस्थित होते.
फोटो - शालेय पोषण आहार योजनेंतर्गत उकडलेली अंड्यांचे वाटप करतांना संस्थेचे पदाधिकारी.
(फोटो १७ देवळा)

Web Title: Students think boiled eggs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा