अतिक्रमण विभागाच्या वाहनासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:48 AM2018-03-06T01:48:12+5:302018-03-06T01:48:12+5:30

महापालिकेने फूलबाजार, सराफबाजार परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या फूलविक्रेत्यांविरुद्ध सोमवारी (दि.५) पुन्हा एकदा कारवाई सुरू केल्यानंतर संतप्त झालेल्या विक्रेत्यांनी अतिक्रमण विभागाचे वाहन अडवत त्यासमोर ठिय्या मांडला. जप्त केलेला माल परत मिळावा यासाठी आंदोलन करणाºया चौघांविरुद्ध महापालिकेने तक्रार दिल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे.

Strike in front of encroachment vehicle | अतिक्रमण विभागाच्या वाहनासमोर ठिय्या

अतिक्रमण विभागाच्या वाहनासमोर ठिय्या

Next

नाशिक : महापालिकेने फूलबाजार, सराफबाजार परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या फूलविक्रेत्यांविरुद्ध सोमवारी (दि.५) पुन्हा एकदा कारवाई सुरू केल्यानंतर संतप्त झालेल्या विक्रेत्यांनी अतिक्रमण विभागाचे वाहन अडवत त्यासमोर ठिय्या मांडला. जप्त केलेला माल परत मिळावा यासाठी आंदोलन करणाºया चौघांविरुद्ध महापालिकेने तक्रार दिल्या-नंतर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे. महापालिकेकडून शहरात रस्त्यावर व्यवसाय करणाºया विक्रेत्यांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. फेरीवाले यांच्यासह रस्त्यात मांडलेल्या टपºया हटविण्याची कारवाई सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम विभागातील फूलबाजार, सराफबाजार परिसरात रस्त्यांवर व्यवसाय करणाºया फूलविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊन त्यांचा माल जप्त केला जात आहे. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक सोमवारी (दि.५) विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी फूलबाजारात जाऊन धडकले. यावेळी, पथकाकडून विक्रेत्यांचा माल जप्त करण्यास सुरुवात झाली. यावेळी, काही विक्रेत्यांनी त्यास विरोध दर्शविला तर काही विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेत अतिक्रमण विभागाच्या वाहनासमोरच ठिय्या मांडला. त्यात महिला विक्रेत्यांचाही मोठा सहभाग होता. जप्त केलेला माल परत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याचवेळी काही विक्रेत्यांनी जमाव जमवत आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे विभागीय अधिकाºयांनी सरकारवाडा पोलिसांना फोन करून जादा कुमक मागवून घेतली. यावेळी, महापालिकेचे वाहन अडवून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रवींद्र सावळीराम दिवे, कल्पेश माधवराव रासकर, शेखर माधवराव रासकर आणि पप्पू सुरेश लोखंडे यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. मनपाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या कारवाईत महापालिकेने सुमारे तीन ट्रक साहित्य जप्त केले. दुपारच्या सत्रात सीबीएस मेघदूत शॉपिंग सेंटर तसेच टॅक्सी स्टॅँड परिसरातीलही अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी सुमारे १५ दुकानांचे पुढे आलेले ओटे, शेड व टपºया हटविण्यात आल्या. यावेळी, महापालिकेची पाच पथके तैनात होती.
फूलविक्रेत्यांना गणेशवाडीत जागा
महापालिकेने यापूर्वी डॉ. प्रवीण गेडाम आयुक्त असताना फूलबाजार स्थलांतरित करण्याची कारवाई केली होती. संबंधित विक्रेत्यांना गणेशवाडी येथील मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, त्याठिकाणी सोयीसुविधा नसल्याचे कारण दर्शवित विक्रेत्यांनी जाण्यास नकार दिला. राजकीय नेत्यांच्या आश्रयामुळे नंतर कारवाई थांबली. आता पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्यात आली असून संबंधित विक्रेत्यांनी गणेशवाडी मार्केटमध्येच स्थलांतरित व्हावे, असा पवित्रा महापालिकेने घेतला आहे.

Web Title: Strike in front of encroachment vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.