बोकडबळी प्रथेच्या जागेवरून गडावर तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:52 AM2018-10-18T00:52:24+5:302018-10-18T00:52:29+5:30

नवरात्रोत्सवाच्या अंतिम सत्रात शिवकालीन परंपरेपासून सुरू झालेली बोकडबळी प्रथा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जागेत करण्याबाबत सूचित केल्याने याविरोधात सप्तशृंग गडावरील व्यावसायिकांनी व्यवसाय बंद केले तसेच ध्वज मिरवणुकीवर बहिष्कार टाकल्याने गडावर तणावाचे वातावरण आहे.

 Stress on the fort from the place | बोकडबळी प्रथेच्या जागेवरून गडावर तणाव

बोकडबळी प्रथेच्या जागेवरून गडावर तणाव

googlenewsNext

नाशिक : नवरात्रोत्सवाच्या अंतिम सत्रात शिवकालीन परंपरेपासून सुरू झालेली बोकडबळी प्रथा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जागेत करण्याबाबत सूचित केल्याने याविरोधात सप्तशृंग गडावरील व्यावसायिकांनी व्यवसाय बंद केले तसेच ध्वज मिरवणुकीवर बहिष्कार टाकल्याने गडावर तणावाचे वातावरण आहे.  सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवात बोकडबळी देण्याची शिवकालीन परंपरा असल्याची ग्रामस्थांची भावना आहे. मंदिरापासून सुमारे शंभर पायऱ्या खाली उतरल्या नंतर उंबराचा वृक्ष आहे त्या ठिकाणी बोकडबळी देण्याची प्रथा आहे. या ठिकाणी बोकडबळी दिल्यानंतर पर्जन्यमानाचे प्रमाण समाधानकारक राहते अशी गडावरील नागरिकांची भावना आहे, तर सप्तशृंग गडावरील न्यासाच्या कार्यक्षेत्रातील पायºयांवरील उंबराच्या झाडाखाली बोकडबळी प्रथा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पार पाडू नये तसेच भावनांचा आदर राखत ही प्रथा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जागेत पार पाडावी, अशी न्यासाची भूमिका आहे. दरम्यान, मागीलवर्षी ग्रामपंचायत हद्दीतील मराठी शाळेच्या पटांगणावर बोकडबळी दिला गेला होता. मात्र यावर्षी गडवासीयांनी उंबराच्या झाडाखाली बोकडबळी देण्याची आग्रही भूमिका घेतली. यातून मार्ग निघत नसल्याने गडावरील शेकडो व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवले. प्युनिक्युऊर ट्रॉलीही बंद ठेवण्यात आली. न्यासाच्या कार्यालयासमोर व्यावसायिक व ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, उशिरापर्यंत याबाबत निर्णय प्रलंबित राहिल्याने तिढा कायम होता. दरम्यान, प्रशासन व ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीत पुढील वर्षापासून कायदेशीर बाबी तपासून बोकडबळीची प्रथा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान मागील वर्षांप्रमाणेच शाळेजवळील पटांगणांत बोकडबळी देण्याचा निर्णय झाल्याचे कळविण्यात आले.

Web Title:  Stress on the fort from the place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.