‘लोकमत’ला लाभले सदिच्छांचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 01:07 AM2019-04-21T01:07:50+5:302019-04-21T01:08:32+5:30

विश्वासार्हता व निर्भिडतेच्या बळावर वाचकांच्या मनावर लोकप्रियतेची अमिट छाप उमटविणाऱ्या ‘लोकमत’वर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावत सदिच्छांचे बळ देत स्नेहभाव वृद्धिंगत केला

 Strengthened by the Lokmat, | ‘लोकमत’ला लाभले सदिच्छांचे बळ

‘लोकमत’ला लाभले सदिच्छांचे बळ

Next

नाशिक : विश्वासार्हता व निर्भिडतेच्या बळावर वाचकांच्या मनावर लोकप्रियतेची अमिट छाप उमटविणाऱ्या ‘लोकमत’वर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावत सदिच्छांचे बळ देत स्नेहभाव वृद्धिंगत केला. निमित्त होते... ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीच्या चोविसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे !
अंबड येथील ‘लोकमत’च्या मुख्य कार्यालयातील हिरवळीवर शनिवारी सायंकाळी सुरेल बासरीवादनाच्या मंगल सुरावटीत हा दिमाखदार सोहळा उत्साहात पार पडला. ‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक व निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी कैलास मठाचे आचार्य स्वामी संविदानंद सरस्वती, पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास, लातूर येथील श्याम चैतन्य महाराज, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या पुष्पादीदी या धार्मिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवरां-बरोबरच नाशिकच्या महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, माजी राज्यमंत्री डॉ.शोभा बच्छाव, माजी खासदार समीर भुजबळ, प्रतापदादा सोनवणे, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, जयंत जाधव, माजी महापौर अशोक मुर्तडक आदी राजकीय, तर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, कुलगुरु ई.वायुनंदन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, वनसंरक्षक अनिल अंजनकर, महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, मुंबई येथील सहनिबंधक (एसआरए) बाजीराव शिंदे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, उपायुक्त रोहिदास बहिरम, कामगार उपआयुक्त गुलाबराव दाभाडे, सहायक कामगार आयुक्त किशोर दहीफळे, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, राज्य पुरातत्व खात्याचे सहायक संचालक विलास वाहाणे, विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने आदींसह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच अन्य क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदार जागृतीसाठी पुढाकार
दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या हिरवळीवर ‘सेल्फी वॉल’द्वारे मतदान जागृती करण्यात आली. ‘मतदान हा आपला हक्क आहे’ व ‘लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करा’, असा संदेश देणाºया या ‘वॉल’जवळ उभे राहून अनेकांनी मतदानाचे आवाहन केले.

Web Title:  Strengthened by the Lokmat,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.