आदिवासी शेतमजुरांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:30 AM2018-07-20T00:30:24+5:302018-07-20T00:32:12+5:30

देवळा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने येथील पाच कंदील चौकात आपल्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आदिवासी शेतमजुरांच्या विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्रीमती परदेशी यांना देण्यात आले.

Stop the way of Tribal Farmers | आदिवासी शेतमजुरांचा रास्ता रोको

आदिवासी शेतमजुरांचा रास्ता रोको

Next
ठळक मुद्देराज्य शेतमजूर युनियनच्या वतीने निवेदन  विंचूर-प्रकाशा मार्गावर वाहनांच्या रांगा

देवळा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने येथील पाच कंदील चौकात आपल्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आदिवासी शेतमजुरांच्या विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्रीमती परदेशी यांना देण्यात आले.
शेतमजुरांच्या चांदवड - देवळा संयुक्त समितीचे सचिव कॉ. भाऊसाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून पाच कंदील चौकापर्यंत तालुक्यातील आदिवासी शेतमजुरांचा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात पुरु ष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दुपारी दीड वाजेच्या सुमारे पाच कंदील चौकात मोर्चा आल्यानंतर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉ. मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शेतमजुरांच्या मागण्यांची दखल घेण्यात येत नसल्याबद्दल शासनाचा निषेध केला.
यावेळी वनविभागाचे वनपाल डी.पी. गवळी, पी.पी. सोमवंशी, आर.बी. बच्छाव आदी उपस्थित होते. निवेदनावर सुभाष सोनवणे, गंगाधर जाधव, शांताराम बोरसे, सुरेश निकम, भाऊसाहेब माळी, रूपचंद ठाकरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वनजमीन कसणाºयाच्या नावे करा
वनजमीन कसणाºयांच्या नावे झाल्या पाहिजेत. तालुक्याच्या प्रत्येक गावातील प्लॉटधारकावरील वनविभागाची दादागिरी थांबली पाहिजे वा सोळ येथील गायरान जमीन आदिवासींच्या नावे करण्यात यावी, आदिवासींवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे, दहिवड येथील आदिवासींची बळकावलेली जमीन त्यांना परत मिळावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. आंदोलन काळात विंचूर - प्रकाशा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महसूल व वनविभागाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Web Title: Stop the way of Tribal Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.