State Zilla Parishad Employees Federation Executive Committee | राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ कार्यकारिणी जाहीर
राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ कार्यकारिणी जाहीर

नाशिक : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या जिल्हा पदाधिकारी मंडळाची निवडणूक राज्य महासंघाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
अध्यक्षपदी अरुण आहेर, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील, मंगला भवार, मानद अध्यक्ष अर्जुन गोटे, बेबी मोरे, सरचिटणीस महेंद्र पवार, कोषाध्यक्ष जगन्नाथ सोनवणे, उपाध्यक्ष किशोर वारे, ज्योती गांगुर्डे, मानद सचिव यासिन सय्यद, सोनाली साठे, सहसचिव रवींद्र ठाकरे, रंजना शिंदे, संघटक योगेश गोळेसर, नामदेव भोये, महेंद्र गांगुर्डे, धनश्री पवार, कायदे सल्लागार सुनील पगार, विनया महाले, प्रसिद्धी प्रमुख जी. बी. खैरनार, प्रमिला चौरे, लेखा परीक्षक रघुनाथ सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा राज्य सरचिटणीस ग्रामसेवक युनियन प्रशांत जामोदे, विभागीय उपाध्यक्ष कैलास वाघचौरे, राज्य अध्यक्ष नर्सेस संघटना शोभा खैरनार, अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटना राज्य अध्यक्ष मंगला भवार, शाखा अभियंता राज्य संघटना रावसाहेब पाटील, महासंघास संलग्न असलेल्या ग्रामसेवक युनियन, लिपिक वर्गीय, अंगणवाडी मुख्य सेविका, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी, लेखा विभाग, विस्तार अधिकारी, कृषी तांत्रिक, पशु संवर्धन, नर्सेस संघटना, औषध निर्माता संघटना, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, वाहनचालक, चतुर्थश्रेणी कर्मचारी या सतरा संवर्गातील जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांचे जिल्हा अध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित होते.


Web Title:  State Zilla Parishad Employees Federation Executive Committee
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.