नाशिकरोड येथील सेतू कार्यालय सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:38 AM2018-05-28T00:38:05+5:302018-05-28T00:38:05+5:30

नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात असलेले सेतू कार्यालय गेल्या तीन महिन्यांपासून बंद असून, विविध दाखल्यांसाठी पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सदर सेतू कार्यालय तातडीने सुरू करावे, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 Start the Setu office at Nashik Road | नाशिकरोड येथील सेतू कार्यालय सुरू करावे

नाशिकरोड येथील सेतू कार्यालय सुरू करावे

googlenewsNext

नाशिक : नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात असलेले सेतू कार्यालय गेल्या तीन महिन्यांपासून बंद असून, विविध दाखल्यांसाठी पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सदर सेतू कार्यालय तातडीने सुरू करावे, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात गेल्या आठ वर्षांपूर्वी सेतू कार्यालय सुरू करण्यात आले. याठिकाणी जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आदींसह विविध दाखले काढण्यासाठी विद्यार्थी आणि पालक येतात. त्यामुळे द्वारका, उपनगर, नाशिकरोड, जेलरोड, शिंदे, पळसे, देवळाली कॅम्प आदी भागांतील नागरिकांची सोय झाली होती. परंतु सदर सेतू कार्यालय गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे सदर सेतू कार्यालय तातडीने सुरू करावे, अशी मागणी समता परिषदेचे तेजस शेरताटे, संतोष पुंड, सौरभ शेरताटे, संतोष लाटे आदींनी केली आहे. यासंबंधी निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.

Web Title:  Start the Setu office at Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.