एसटी कामगार संघटना आंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:35 AM2018-10-23T01:35:18+5:302018-10-23T01:35:46+5:30

वेतनकरारासह कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांकडे महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी मागीलवर्षी ऐन दिवाळीत चार दिवसांचा संप करणाऱ्या एसटी कामगार संघटनेने यंदाच्या दिवाळीतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा तयारी केली असून, ३० आॅक्टोबरला आझाद मैदानापासून उपोषणाला सुरुवात होऊन १ नोव्हेंबरपासून राज्यातील विभागीय कार्यालयांसमोर उपोषणाला सुरुवात होणार आहे.

 ST trade union organization agrees to agitation | एसटी कामगार संघटना आंदोलनाच्या तयारीत

एसटी कामगार संघटना आंदोलनाच्या तयारीत

Next

नाशिक : वेतनकरारासह कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांकडे महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी मागीलवर्षी ऐन दिवाळीत चार दिवसांचा संप करणाऱ्या एसटी कामगार संघटनेने यंदाच्या दिवाळीतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा तयारी केली असून, ३० आॅक्टोबरला आझाद मैदानापासून उपोषणाला सुरुवात होऊन १ नोव्हेंबरपासून राज्यातील विभागीय कार्यालयांसमोर उपोषणाला सुरुवात होणार आहे. ऐन दिवसाळीतील संपामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता असल्यामुळे महामंडळ उपोषणावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  मान्यताप्राप्त संघटनेने कर्मचाºयांच्या हितासाठी वारंवार अनेक प्रश्न मांडले आहेत, परंतु महामंडळाकडून प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने तसेच वेतनकरारावर अद्यापही तळ्यात-मळ्यात सुरू असल्यामुळे महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी या दिवाळीत संघटनेने पुन्हा आंदोलनाची हाक दिलेली आहे. सन २०१६-१७ या कालावधीच्या वेतन करारासाठी एकतर्फी वेतनवाढ जाहीर करण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. वेतनवाढ जाहीर करण्यात आली असली तरी चार वर्षांच्या वेतनवाढीसाठी जाहीर केलेले ४८४९ कोटींचे पॅकेज संघटनेने मान्य केलेले आहे. परंतु प्रशासनाने सदर पॅकेच वाटपाचे सूत्र वापरलेले आहे त्या सूत्रामुळे ४,८४९ कोटींमधील सुमारे १,५०० कोटी इतकी रक्कम शिल्लक राहत असल्यामुळे सदर रकमेचे कामगारांना वाटप होणे अपेक्षित असल्याची भूमिका संघटनेने घेतलेली आहे.
वेतनकरारातील अनेक मुद्द्यांवर कामगार संघटनेने अद्यापही स्वाक्षरी केलेली नसून प्रशासन लवचिक भूमिका घेण्यास तयार नसल्यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोष असल्याचा दावा संघटनेने केला आहे. प्रशासननाच्या या भूमिकेमुळे कामगारांमध्ये नाराजी आहे. कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास ३० आॅक्टोबरपासून आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असे संघटनेने कळविले आहे.  संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी २२ विविध प्रकारच्या मागण्या मांडलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने एकतर्फी करण्यात आलेली वेतनवाढ कोंडी दूर करावी, कामबंद आंदोलनात सहभागी कर्मचाºयांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, खासगीकरणातून घेण्यात आलेल्या शिवशाही बसेस महामंडळानेच चालवाव्यात, महामंडळात विविध सेवांचे कंत्राटीकरण सुरू झाल्याने कर्मचाºयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. या कर्मचाºयांना दिलासा देण्यासाठी कंत्राटी कामाची पद्धत बंद करण्यात यावी, मयत आणि अपंगत्व आलेल्या कर्मचाºयांच्या वारसांना सुविधा तसेच नोकरी देण्याबाबतची तरतूद असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या मागण्यांप्रमाणेच अन्य अनेक महत्त्वाच्या मागण्या संघटनेने केलेल्या आहेत.
वेतनकरार हेच मुख्य कारण
कामगार संघटनेने विविध प्रकारांच्या २२ अडचणी आणि प्रश्नांबाबत उपोेषणाची हाक दिलेली असली तरी प्रत्यक्षात मात्र वेतनकरार हा विषय पुन्हा यानिमित्ताने संघटनेने समोर आणला आहे. संघटनेकडून या कराराबाबत घेण्यात आलेली भूमिका सावध असल्याचे गेल्या काही बैठकांमध्ये दिसून आलेली आहे. आक्रमकपणे हा मुद्दा व्यासपीठावरून अनेकदा मांडण्यात आलेला आहे. परंतु मधल्या काळात काय चर्चा होते याबाबतची माहिती मिळतही नाही. आता पुन्हा दिवाळीचा मुहूर्त साधून कामगारांनी उपोेषणाचा इशारा दिलेला आहे. याच प्रश्नावर कामबंद आंदोलन, असहकार तसेच विभागीय कार्यशाळांमध्ये होणाºया हाणामाºयापर्यंत प्रकरण गेल्याने ही बाब आता अत्यंत असंवेदनशील बनली आहे.

Web Title:  ST trade union organization agrees to agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.