वसंत डहाके यांना जनस्थान पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 07:12 PM2019-02-27T19:12:13+5:302019-02-27T19:13:34+5:30

प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

Spring Dahake awarded the Janasthan Award | वसंत डहाके यांना जनस्थान पुरस्कार प्रदान

वसंत डहाके यांना जनस्थान पुरस्कार प्रदान

Next
ठळक मुद्देमहाकवी कालिदास कालामंदिरात आयोजित सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर साहित्यिक प्रभा गणोरकर, महापौर रंजना भानसी, प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह मकरंद हिंगणे, उपाध्यक्ष संजय पाटील यांचेसह विश्वस्त उपस्थित होते.सोहळ्यापूर्वी वसंत डहाके यांनी टिळकवाडीतील कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी जाऊन तात्यासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

नाशिक - येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान च्यावतीने दर वर्षाआड दिला जाणारा यंदाचा जनस्थान पुरस्कार जेष्ठय कवी, कादंबरीकार आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
महाकवी कालिदास कालामंदिरात आयोजित सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर साहित्यिक प्रभा गणोरकर, महापौर रंजना भानसी, प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह मकरंद हिंगणे, उपाध्यक्ष संजय पाटील यांचेसह विश्वस्त उपस्थित होते. यावेळी साहित्यिक संजय भास्कर जोशी यांनी डहाके यांच्या वाङ्ममयीन कारकीर्दीचा आढावा घेत गौरव केला.   मधू मंगेश कर्णिक यांनीही तात्यासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत डहाके यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले.  प्रारंभी क.का. वाघ ललित कला महाविद्यालयाच्या विद्यार्थी व संगीत शिक्षकांनी प्रकाशदाता.. जीवनदाता... ही कुसुमाग्रज यांची सूर्याची प्रार्थना सादर केली. कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी प्रास्ताविक केले. स्वानंद बेदरकर  यांनी मानपत्र वाचन केले. सोहळ्याला नाशिककर मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान, कालिदास कलामंदिरच्या आवरात आजवरचे जनस्थान पुरस्कार प्राप्त सारस्वतांची स्केचेस लावण्यात आली होती. सोहळ्यापूर्वी वसंत डहाके यांनी टिळकवाडीतील कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी जाऊन तात्यासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

Web Title: Spring Dahake awarded the Janasthan Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.