नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच; शिवाजीचौकात चेनस्रॅचिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 07:02 PM2018-02-24T19:02:37+5:302018-02-24T19:02:37+5:30

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवाजी चौकात एका पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबाडल्याची घटना

 Sonashakhali stealing session begins in Nashik; Chain seating in Shivaji Chowk | नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच; शिवाजीचौकात चेनस्रॅचिंग

नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच; शिवाजीचौकात चेनस्रॅचिंग

Next
ठळक मुद्देसहा ग्रॅम वजनाची सुमारे १५ हजार रुपये किमतीची सोनसाखळीपादचारी महिलेची सोनसाखळी ओरबाडल्याची घटना

नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनाही थांबल्या नसून दररोज विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत यासंबंधी गुन्हे दाखल होतात. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवाजी चौकात एका पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबाडल्याची घटना उघडकस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किरण प्रकाश कडवे (२०, रा. जुने सिडको) या रात्री जेवणानंतर शतपावलीसाठी बाहेर पडल्या असता, सुंदरबन कॉलनी रस्त्यावरून जात होत्या. यावेळी शिवाजी चौकाकडून महामार्गाच्या दिशेने एका पल्सर दुचाकीवरून दोघे अज्ञात चोरट्यांनी येऊन कडवे यांच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाची सुमारे १५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी बळजबरीने हिसकावून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


चोरटे सक्रिय : भर वर्दळीच्या ठिकाणाहून दुचाकी लंपास
नाशिक : शहरातून दुचाकी चोरीचा सिलसिला अद्याप थांबलेला नाही. विविध उपनगरांमध्ये सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. आडगाव, नवीन सीबीएस परिसरातून दोन दुचाकी अज्ञात दुचाकी चोरांनी लंपास केल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातून नंदू शिवराम दरेकर (४०, कोणार्कनगर) यांच्या मालकीची हीरो होंडा पॅशन (एमएच१५, सीझेड ६६९१) चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुसरी घटना सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन सीबीएस बसस्थानकाच्या परिसरात घडली. अशोकस्तंभ येथून होंडा कंपनीची दुचाकी (एमएच१५, बीएफ ८१५५) चोरट्यांनी लंपास के ली. याप्रकरणी मोहन रणखांबे (५८, ज्ञानगंगा सोसा. पोकार कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूणच शहरातून दुचाकी चोरीचे सत्र अद्याप थांबलेले नाही. दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title:  Sonashakhali stealing session begins in Nashik; Chain seating in Shivaji Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.