लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होत असताना महापालिका शाळा प्रशासनाला आतापर्यंत केवळ १५० शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्यात यश आले आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने शाळाबाह्य मुलांना शाळेपर्यंत आणण्यासाठी शनिवारी (दि.२४)शहरात सर्वेक्षण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून सर्वेक्षणात महापालिका शाळांच्या शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांचीही मदत घेतली जाणार आहे.
शहरातील विविध भागातील आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना वारंवार प्रयत्न करूनही महापालिकोच्या शिक्षण खात्याला शंभर टक्के यश नसल्याची बाब समोर आली आहे. गेल्यावर्षी शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी विकिसत केलेल्या अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली असताना शहरात विविध ठिकाणी शाळाबाह्य मुले आढळली होती.