स्मार्ट सिटी कंपनी : निविदांचा कालावधी ४५ दिवसांवर आणण्याचा निर्णय माहिती तंत्रज्ञानाधारित १२० कोटींचे प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:18 AM2017-12-29T01:18:08+5:302017-12-29T01:18:43+5:30

नाशिक : माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित १२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या निविदा काढण्यास नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Smart City Company: Information technology-targeted 120 crores project to be completed on 45 days | स्मार्ट सिटी कंपनी : निविदांचा कालावधी ४५ दिवसांवर आणण्याचा निर्णय माहिती तंत्रज्ञानाधारित १२० कोटींचे प्रकल्प

स्मार्ट सिटी कंपनी : निविदांचा कालावधी ४५ दिवसांवर आणण्याचा निर्णय माहिती तंत्रज्ञानाधारित १२० कोटींचे प्रकल्प

Next
ठळक मुद्देवार्षिक अंदाजपत्रकात सुधारणा निविदा कालावधी ४५ दिवसांचा

नाशिक : माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित १२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या निविदा काढण्यास नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सदर प्रकल्पांना गती मिळण्यासाठी ९० दिवसांचा निविदा कालावधी ४५ दिवसांवर आणण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.
स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, माहिती तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांची व्याप्ती पाहता कंपनीच्या वार्षिक अंदाजपत्रकात सुधारणा करण्यात आली. यावेळी, माहिती तंत्रज्ञानाधारित १२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या निविदाप्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने, स्मार्ट सिटी आॅपरेशन सेंटर, स्मार्ट कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर, सिटिझन एक्सपिरियन्स सेंटर, इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टम याशिवाय, सेन्सर, वायफाय सिस्टम यांचा समावेश आहे. सदर प्रकल्पांना गती मिळावी यासाठी निविदा कालावधी ४५ दिवसांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, बैठकीत जनसंपर्क अधिकारी, लघुलेखक यांच्यासह आठ तांत्रिक पदांनाही मंजुरी देण्यात आली. यावेळी, सुरक्षित नाशिकचा आढावा घेण्यात आला. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी त्यातील काही अडचणी सांगितल्या. आॅप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे निर्माण करण्यासाठी राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळाचे बदललेले सचिव श्रीनिवासन यांच्याशी चर्चा करण्याचे ठरले. सोलर पॅनल आणि पायलट स्मार्ट रोडच्या निविदा प्रसिद्ध झाल्याची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली. येत्या सप्ताहात आयसीटी इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट पथदीप, स्मार्ट पार्किंग, पब्लिक सायकल शेअरिंग, प्रोजेक्ट गोदाअंतर्गत पायाभूत सुविधा व सुशोभिकरण या प्रकल्पांच्याही निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीला, कंपनीचे संचालक महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, तज्ज्ञ संचालक तुषार पगार यांच्यासह अन्य संचालक, अधिकारी उपस्थित होते.
संचालक मंडळाच्या नियुक्त्या कायम
संचालक मंडळाची बैठक होण्यापूर्वी कंपनीची वार्षिक सभा झाली. यावेळी, महापौर रंजना भानसी, महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, तज्ज्ञ संचालक तुषार पगार, केंद्रीय शहर विकास मंत्रालयाच्या सचिव रेणू सतिजा, सिडकोच्या सहसंचालक प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या नियुक्त्या कायम करण्यात आल्या. याशिवाय, लेखापरीक्षक म्हणून साबद्रा अ‍ॅण्ड साबद्रा कंपनीची, तर सनदी लेखापाल म्हणून उल्हास बोरसे अ‍ॅण्ड कंपनी यांची नियुक्ती करण्यात आली. सनदी लेखापालाने तर मासिक पाच हजार रुपये मानधनावर काम करण्याची तयारी दाखविली आहे.

Web Title: Smart City Company: Information technology-targeted 120 crores project to be completed on 45 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.