रस्ता रूंंदीकरणासाठी वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 03:06 PM2018-12-13T15:06:07+5:302018-12-13T15:06:24+5:30

साकोरा - गेल्या काही दिवसांपासून नांदगाव ते औरंगाबाद रस्ता रु ंदीकरणाचे काम शासनाने हाती घेतले असून, त्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून वाढलेली डेरेदार मोठी झाडांची सर्रास कत्तल केली जात असल्याने परिसर भकास दिसू लागला आहे.

Slaughter of trees for widening the road | रस्ता रूंंदीकरणासाठी वृक्षांची कत्तल

रस्ता रूंंदीकरणासाठी वृक्षांची कत्तल

Next

साकोरा - गेल्या काही दिवसांपासून नांदगाव ते औरंगाबाद रस्ता रु ंदीकरणाचे काम शासनाने हाती घेतले असून, त्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून वाढलेली डेरेदार मोठी झाडांची सर्रास कत्तल केली जात असल्याने परिसर भकास दिसू लागला आहे. विकासाच्या दृष्टीने रस्ते जरी महत्त्वाचे असले तरी इतकी मोठी झाडे न तोडता त्यांना वाचवून त्यांचे दुसऱ्या जागेवर प्रत्यारोपण केले गेले असते? असा संतप्त सवाल निसर्गप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींमध्ये उपस्थित होत आहे. शासन दरवर्षी मोठ्या जाहिराती देऊन वृक्षारोपण उपक्र म राबवित आहे. यावर्षी शासनाने पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर ‘एकच लक्ष,एक कोटी वृक्ष’ लागवडीचा मोठा गाजावाजा करीत मोकळ्या जागेत वृक्ष लागवड केले. मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने कीती झाडे जगली आहेत. याचा शोध न घेता, उलट आता रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली शेकडो वर्षे जुनी झाडे तोडण्याचा सपाटा सुरू केला आहे. आज हिवाळा आहे मात्र येत्या दोन महिन्यानंतर तप्त उन्हाळ्यात रस्त्यावर येणारे - जाणारे प्रवासी क्षणभर सावली पाहून विश्रांतीसाठी या झाडांचा सहारा घेत होते.मात्र साकोरा रस्ता उड्डानपुल ते गंगाधरीच्या अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या एकुण वीस ते बावीस झाडांची कत्तल केली असून अजून शेकडो झाडे तोडली जाणार असतांना त्या बदल्यात किती झाडांचे संगोपन झाले? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: Slaughter of trees for widening the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक