टाकाऊ वस्तूंपासून आकाशकंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:23 PM2018-11-02T23:23:39+5:302018-11-02T23:34:35+5:30

मालेगाव : दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा आकाशकंदील, विविध प्रकारच्या पणत्यांनी सजू लागल्या आहेत. विविध प्रकारचे आकाशकंदील ग्राहकांना भुरळ घालत आहेत. ...

The sky is shaded from waste things | टाकाऊ वस्तूंपासून आकाशकंदील

मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनविलेले आकर्षक आकाशकंदील. समवेत मुख्याध्यापक राजेंद्र मगर, नूतन चौधरी, संगीता पवार, शोभा शेवाळे.

googlenewsNext
ठळक मुद्देमालेगाव : फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प

मालेगाव : दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा आकाशकंदील, विविध प्रकारच्या पणत्यांनी सजू लागल्या आहेत. विविध प्रकारचे आकाशकंदील ग्राहकांना भुरळ घालत आहेत. तालुक्यातील टेहरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तंूपासून आकर्षक आकाशकंदील बनवून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता निर्माण व्हावी या हेतूने शिक्षिका नूतन चौधरी यांच्या संकल्पनेतून शाळेत टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक आकाशकंदील बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी रिकाम्या पाण्याच्या बाटल्या संकलित केल्या. बाटलीला उभ्या पद्धतीने चहूबाजूने कटरच्या सहाय्याने कापण्यात आले. प्रत्येक बाटलीत फुगा टाकून फुगा फुगविण्यात आला. त्याला दोरी बांधून झाकण लावून बंद करून आकर्षक असे आकाशकंदील तयार करण्यात आले आहेत. हे आकाशकंदील शाळेत तसेच घरी विद्यार्थ्यांनी लावले आहेत. विद्यार्थ्यांना या उपक्रमात मुख्याध्यापक राजेंद्र मगर, संगीता पवार, स्वाती शेवाळे, शोभा शेवाळे, विजया निकम, नलिनी घोरपडे, कन्हैया गांगुर्डे, युसूफ मन्सुरी आदींचे मार्गदर्शन लाभले.आनंद द्विगुणित बाजारात शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत मिळणारा आकाशकंदील घेण्यापेक्षा टाकाऊ वस्तूंपासून बनविलेला आकाशकंदिलांनी दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित केला आहे. बाजारात खरेदी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी तयार केलेला आकाशकंदील स्वस्त पडतो.

Web Title: The sky is shaded from waste things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.