प्राणघातक हल्ल्याप्रकरणी सहा वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:20 AM2019-03-13T00:20:51+5:302019-03-13T00:22:05+5:30

जुन्या भांडणाची कुरापत काढून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डीफाटा येथे २०१६साली प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती. या हल्ल्यातील गणेश लक्ष्मण शिंदे यास सोमवारी (दि.११) जिल्हा व सत्र न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे दोषी धरले. जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांनी सहा वर्षे साधा कारावासाची शिक्षा सुनावली.

Six years of imprisonment for deadly assault | प्राणघातक हल्ल्याप्रकरणी सहा वर्षे कारावास

प्राणघातक हल्ल्याप्रकरणी सहा वर्षे कारावास

Next
ठळक मुद्देतक्रारदार फितूर : परिस्थितीजन्य पुरावा

नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डीफाटा येथे २०१६साली प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती. या हल्ल्यातील गणेश लक्ष्मण शिंदे यास सोमवारी (दि.११) जिल्हा व सत्र न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे दोषी धरले. जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांनी सहा वर्षे साधा कारावासाची शिक्षा सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना ३ मे २०१६ रोजी पाथर्डीफाटा भागात झाली होती. या खटल्यात जखमी झालेला अंकुश रमेश कुशाळकर व फिर्यादी असलेला त्याचा भाऊ यांनी साक्ष फिरवून फितुरी केली; मात्र तपासी अधिकारी उपनिरीक्षक संघर्ष श्रृंगारे यांनी गुन्ह्याचा पाठपुरावा करत परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाला सादर केले. तसेच गुन्ह्यातील पंच व वैद्यकीय अधिकारी यांनी न्यायालयात दिलेली साक्षदेखील महत्त्वाची ठरली. त्याअधारे न्यायालयाने शिंदे यास दोषी धरले व सहा वर्षे कारावास व अकरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने शिक्षेत वाढ करण्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी बाजू मांडली.

Web Title: Six years of imprisonment for deadly assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.