सुरगाण्यात सहा जणांना अतिसाराची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 01:05 AM2019-04-21T01:05:09+5:302019-04-21T01:05:31+5:30

सुरगाणा येथे दूषित पाण्यामुळे पुन्हा एकदा अतिसाराची साथ उद्भवली असून, सहा रुग्णांना लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मागील वर्षी येथे अतिसाराने तिघांना जीव गमवावा लागला होता.

Six people infected with diarrhea in Surgana | सुरगाण्यात सहा जणांना अतिसाराची लागण

सुरगाण्यात सहा जणांना अतिसाराची लागण

Next

नाशिक : सुरगाणा येथे दूषित पाण्यामुळे पुन्हा एकदा अतिसाराची साथ उद्भवली असून, सहा रुग्णांना लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मागील वर्षी येथे अतिसाराने तिघांना जीव गमवावा लागला होता.
दूषित पाण्यामुळे अतिसाराचा उद्रेक होऊन सहा जणांना लागण झाल्याने सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत अंबोडा, झगडेपाडा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या सूचनेनुसार त्वरित पाणी व स्वच्छता कक्षातील चमूने व अंबोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी पथकाने भेट देऊन याबाबत माहिती घेतली.
सुरगाणा तालुक्यातील झगडेपाडा येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे पाणी दूषित होऊन अतिसाराची लागण झाली होती. याबाबत डॉ. गिते यांनी वेळीच उपाययोजना करण्याचे आदेश दिल्यानुसार पाणी व स्वच्छता कक्षातील चमूने व अंबोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी पथकाने पाणी शुद्धीकरणाचा आढावा घेत सर्व संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करण्याबाबत सूचना दिल्या.
यावेळी विहिरीची पाहणी करण्यात आली. अंबोडा येथील ग्रामीण रुग्णालय बाºहे येथे भेट दिली असता असलेले आंतररुग्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सद्यस्थितीत एकही गंभीर रुग्ण नसल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.
ग्रामपंचायत अंबोडा, झगडेपाडा येथील ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांची बैठक घेण्यात येऊन त्यांना सद्यस्थितीत विहिरीचे पाणी पिण्यास न वापरण्याबाबत, परंतु पाड्यावरील उपलब्ध हातपंपाचे पाणी पिण्यास, वापरण्याबाबत तसेच पिण्याच्या पाण्यात जीवन ड्रॉपचा वापर करण्याबाबत तसेच पाणी उकळून व गाळून पिण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे यांनी सांगितले. यावेळी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत, जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी व पथक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, उपपाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Web Title: Six people infected with diarrhea in Surgana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.