सिन्नरला बचत गटाच्या महिलांकडून बारव स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 05:15 PM2019-05-30T17:15:15+5:302019-05-30T17:16:25+5:30

सिन्नर : धारणकर गल्लीतील ऐतिहासिक पुरातन बारवेतील गाळ काढण्यासाठी बुधवार (दि.२९) रोजी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. सिन्नर नगरपरिषद, दिनदयाळ अंत्योदय योजना-  नागरी उपजिविका अभियान, शहर अभियान व्यवस्थापन कक्ष व उन्नती शहर स्तरीय संघांनी यावेळी सहभाग घेऊन श्रमदान केले.

 Six cleanliness from women of Sinnar group | सिन्नरला बचत गटाच्या महिलांकडून बारव स्वच्छता

सिन्नरला बचत गटाच्या महिलांकडून बारव स्वच्छता

Next

सिन्नरमधील धारणकर गल्ली येथे असलेली पुरातन बारव कालानुरूप बुजून गेली होती. सदर बारवेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी १५ ते २० दिवसांपासून शिवराय कला क्रीडा मित्र मंडळ, इच्छामणी मित्रमंडळ व तुफान आलयां जलमित्र मंडळाद्वारे श्रमदान करून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या पुढाकारातून या बारवेमधील गाळ काढण्याचे काम चालू आहे. नगराध्यक्ष नियमितपणे या श्रमदानात सहभागी होतात. या कार्यात शहरी उद्योजक, नागरिक, महिला यांनी उत्स्फूर्तता दाखवली आहे. आपण देखील या कार्यात सहभाग घ्यावा या प्रेरणेने उन्नती शहरस्तरीय संघातील ४२ महिला सदस्यांनी श्रमदान केले. नगराध्यक्ष डगळे व मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबविण्यात आली. शुक्रवार (दि. ३१) पर्यंत सकाळी ७ ते ९ यावेळेत महिला श्रमदानासाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी बाबासाहेब बैरागी, चंदन देशमुख, दत्ता बोºहाडे, राजेंद्र क्षत्रिय, विठ्ठल गोबडे यांच्यासह अनेक श्रमदाते कार्य करत असून आज उन्नती शहर संघाच्या अंतर्गत समर्थ, ओजस्वी, स्त्रीशक्ती, कल्पतरू, साई श्रद्धा, श्री जीवेश्वर कालिका, ख्वाजा अजमेरी आदी गटांतील महिलांनी उत्साहात सहभाग घेवून श्रमदानाचे कार्य केले. यात उन्नती शहर संघाच्या अध्यक्ष निलोफर सय्यद, अनुराधा लोंढे, सोनली लोणारे, अश्विनी बोकरे, छाया शिलावट, रेखा शिंदे, रेणुका बो-हाडे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.

Web Title:  Six cleanliness from women of Sinnar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.