Six accused in the asphalt case | डांबर चोरीप्रकरणी सहा अटकेत
डांबर चोरीप्रकरणी सहा अटकेत

इगतपुरी : टाके घोटी गावाजवळ ४ टँकरमधून डांबर काढणाऱ्या ६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, चार जण फरार झाले आहेत. डांबराच्या चार टँकरसह ७८ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.  टाके घोटी गावाजवळ मंगळवारी(दि.२२) रात्री दहा वाजता दशरथ दालभगत यांच्या शेताजवळ विनापरवाना मालकांच्या संमती शिवाय टँकरमधून संशयित डांबर काढत होते. मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानुसार छापा टाकला.  यात इसरार खान जमीलउद्दीन (रा. बेलखरी जि. प्रतापगड उ. प्र.), लखाराम बगतराम पटेल (रा. गुंडाली जि. उदयपुर राजस्थान), रूपलाल काळूजी पटेल (ता. गिरवा जि. उदयपुर), अजहर अय्यूब खान (रा. इछावर जि. शिहोर म. प्र.), वसीम शरीफ खान (रा. इछावर जि. शिहोर म. प्र.), दशरथ दालबगत (रा. इगतपुरी जि. नाशिक), वर्दा पटेल, रवि पटेल, रामदास आढोळे (रा. टाके), टँकरचालक डांबर काढताना आढळून आले.
सहा जणांना पथकाने ताब्यात घेतले. चार टॅँकरसह ७८ लाख १९ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यात विशेष पथकाने गुन्हा दाखल केला.
ताब्यातील टँकर
एमएच ४३, ३९२७ मध्ये १९२३० किलो डांबरासह टँकरची किंमत ३०,३२,११३ रुपये
एमएच ०४ जीआर ३२९९ मध्ये १९६६० किलो डांबरासह टँकर किंमत अंदाजे ३१,३६,८०७ रुपये
जीजे ६ टीटी ४७७१ मध्ये २००० किलो डांबरासह टँकर किंमत १०,८०,००० रूपये
एमपी ०४ सीएम ६३४२ किंमत अंदाजे पाच लाख एका आरोपीच्या झडतीत रोख रक्कम रूपये ७०,६५० मिळून आले. असे एकूण ७८ लाख, १९हजार ५७० रूपयांसह मिळून आल्याने आरोपींवर इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Web Title:  Six accused in the asphalt case
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.