भिंगारे येथे बहीण-भावाची आत्महत्या; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:47 AM2018-10-14T00:47:40+5:302018-10-14T00:47:58+5:30

येवला तालुक्यातील भिंगारे येथील चांगदेव लक्ष्मण सोनवणे (५६) व इल्ह्याबाई सोनवणे (४५) या भाऊ-बहिणीने कौटुंबिक वादातून आत्महत्त्या केली. दरम्यान,आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणाने पोलिसांनी संतोष चांगदेव सोनवणे यास ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Sister and brother's suicide in Bhingara; One arrested | भिंगारे येथे बहीण-भावाची आत्महत्या; एकास अटक

भिंगारे येथे बहीण-भावाची आत्महत्या; एकास अटक

Next

येवला : तालुक्यातील भिंगारे येथील चांगदेव लक्ष्मण सोनवणे (५६) व इल्ह्याबाई सोनवणे (४५) या भाऊ-बहिणीने कौटुंबिक वादातून आत्महत्त्या केली. दरम्यान,आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणाने पोलिसांनी संतोष चांगदेव सोनवणे यास ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेची कारवाई उशिरापर्यंत चालू होती.
चांगदेव सोनवणे व त्यांची बहीण इल्ह्याबाई सोनवणे या दोघांनी त्यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये शनिवारी सकाळी ७ वाजता उडी मारून जीवन संपविले. मयताची मुलगी मीना बाळासाहेब ठाकरे (रा. काजीसांगवी ता.चांदवड) यांनी येवला तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, संतोष चांगदेव सोनवणे याने चांगदेव सोनवणे व आत्या इल्ह्याबाई सोनवणे यांना शेती वाटपाच्या कारणावरून अनेकदा मारहाण करून त्रास दिला. या जाचाला कंटाळून या दोघांनी शेतातील तळ्यात उडी घेऊन आत्महत्त्या केली. संतोष सोनवणे याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


संशयित संतोष याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून शनिवारी रात्री उशिरापर्यंत अटकेची कार्यवाही चालू होती.
================================================
.तळ्यात पडून दोघा बहीण भावाचा मृत्यू झाल्याची घटना भिंगारे व परिसरात पसरताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. दरम्यान येथील पोलिस पाटील शिवाजी पाटील गाडे यांनी येवला तालुका पोलिसांना दिली. शेततळे पूर्ण भरलेले असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या सहायाने तळे फोडून पाणी कमी करून स्थानिक पोहणार्यानी दुपारी एक वाजता मृतदेह बाहेर काढले.सहाय्यक पोलीस अधीक्षक रागसुधा आर,यांनी घटनास्थळी भेट दिली.पोलीस येवला तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर,पुढील कार्यवाही करीत आहे.दहा ते बारा एकर जमिनीचे वाद असल्याचे समोर आले असून, जमिनीवर स्टे असल्याने दोन वर्षांपासून जमीन पंडित असल्याने या वादातून आत्महत्या केली की काही घातपात झाला याचा तपास करत आहेत.

Web Title: Sister and brother's suicide in Bhingara; One arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.