बांगलादेशी मुलीचा सौदा करणा-या सिन्नरच्या ‘नानी’सह दोघांना सात दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 02:02 PM2017-12-16T14:02:44+5:302017-12-16T15:57:41+5:30

वेश्या व्यवसायासाठी मावशीने आपल्या भाचीला बांगलादेशामधून भारत फिरविण्याच्या बहाण्याने आणत नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव परिसरात चालणा-या कुंटणखाण्याच्या ‘नानी’ला दहा महिन्यांपुर्वी विकल्याची धक्कादायक माहिती बुधवारी पिडित मुलीने सांगितलेल्या आपबितीनंतर पुढे आल्याने अवघे राज्य हादरले होते.

 Sinnar's 'Nani', a seven-day stolen double dealer for Bangladeshi girl smaglling | बांगलादेशी मुलीचा सौदा करणा-या सिन्नरच्या ‘नानी’सह दोघांना सात दिवसांची कोठडी

बांगलादेशी मुलीचा सौदा करणा-या सिन्नरच्या ‘नानी’सह दोघांना सात दिवसांची कोठडी

Next
ठळक मुद्दे पिडित मुलीला देहविक्रयच्या नरकारत ढकलणारी तिची मावशी अद्याप फरार

नाशिक : बांग्लादेशी मुलीची देहविक्रयसाठी खरेदी करणा-या सिन्नरच्या मुसळगाच्या ‘त्या’ कुंटणखान्याची मालकीण संशयित नानी उर्फ मंगल नंदकिशोर गंगावणेसह पिडितेवर बलात्कार करणारा नानीचा नराधम मुलगा संशयित विशाल नंदकिशोर गंगावणे व दलाल सोनू नरहरी देशमुख या तीघा संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पिडित मुलीला देहविक्रयच्या नरकारत ढकलणारी तिची मावशी व काही दलाल अद्याप फरार असून ग्रामिण पोलीस करीत आहेत.
वेश्या व्यवसायासाठी मावशीने आपल्या भाचीला बांगलादेशामधून भारत फिरविण्याच्या बहाण्याने आणत नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव परिसरात चालणा-या कुंटणखाण्याच्या ‘नानी’ला दहा महिन्यांपुर्वी विकल्याची धक्कादायक माहिती बुधवारी पिडित मुलीने सांगितलेल्या आपबितीनंतर पुढे आल्याने अवघे राज्य हादरले होते. पीडित मुलीचा सौदा ‘नानी’ने मुंबईच्या कुंटणखाण्यासाठी केला आणि काही महिने मुंबईला पिडित मुलगी राहिली व तेथून पुन्हा तीला कोलकात्याच्या ‘त्या’ बाजारात देहविक्र यासाठी विकले गेले, असा तीचा संपूर्ण प्रवासातील नरकयातना पिडित मुलीने बुधवारी नाशिकमध्ये येऊन माध्यमांसमोर मांडल्या. यानंतर ग्रामिण पोलीस दलासह अवघ्या राज्याला हादरा बसला. पोलीस अधिक्षक संजय दराडे यांनी याबाबत दखल घेऊन तत्काल उपअधिक्षक विशाल गायकवाड यांना त्वरित तपासचक्रे फिरवून संशयित आरोपींना अटक करण्याचे फर्मान बजावले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक करपे यांच्या पथकाने सिन्नर येथे जाऊन संशयित नानीचा मुलगा व दलाला बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले व नानीच्या गुरूवारी मुसक्या आवळल्या. या सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सिन्नर औद्योगिक वसाहत पोलीसांची भूमिका संशयास्पद असल्याचे पिडित मुलीने दिलेल्या जबाबावरून पुढे आले आहे. सिन्नर पोलिसांनी दहा महिन्यांपुर्वी दखल घेऊन बांग्लादेशी मुलीची खरेदी करणारी ‘नानी’ला खाकीचा हिसका दाखविला असता तर कदाचित ती मुलगी मुंबई येथून पोलिसांना मिळाली असती व तीचा कोलकात्याचा ‘सौदा’ टळला असता अशी चर्चा सुरू आहे. एकूणच या प्रकरणाच्या तपासाकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले असून पिडित मुलगी बांगलादेशला तिच्या कुटुंबापर्यंत कधी पोहचणार याकडे लक्ष लागले आहे.




 

Web Title:  Sinnar's 'Nani', a seven-day stolen double dealer for Bangladeshi girl smaglling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.