Sinnar: Sudhakar Shinde's recitation as Vice President; Both the selections are copper for the post of uncontested market committee | सिन्नर : उपसभापतिपदी सुधाकर शिंदे यांची वर्णी; दोन्ही निवड बिनविरोध बाजार समितीच्या सभापतिपदी तांबे

ठळक मुद्दे केवळ दोन उमेदवारी अर्ज प्राप्त बिनविरोध निवडीची घोषणा

सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी गोंदे येथील विनायक चंद्रभान तांबे, तर उपसभापतिपदी सायाळे येथील सुधाकर राधू शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार माणिकराव कोकाटे गटाची सत्ता आहे. अडीच वर्षांपूर्वी बाजार समितीच्या सभापतिपदी अरुण वाघ, तर उपसभापतिपदी सोमनाथ भिसे यांची निवड करण्यात आली होती. सहकारी संचालकांना संधी मिळावी यासाठी वाघ व भिसे यांनी अनुक्रमे सभापती व उपसभापतिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नूतन सभापती व उपसभापती निवडीसाठी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात संचालक मंडळाची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सहायक निबंधक अर्चना सैंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत निर्धारित वेळेत केवळ दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. सभापतिपदासाठी विनायक तांबे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून मावळते सभापती अरुण वाघ यांनी, तर उपसभापतिपदाचे सुधाकर शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून मावळते उपसभापती सोमनाथ भिसे यांनी स्वाक्षरी केली होती. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक-एकच अर्ज आल्याने सभापतिपदी तांबे यांची, तर उपसभापतिपदी शिंदे यांची बिनविरोध निवडीची घोषणा सहायक निबंधक अर्चना सैंदाणे यांनी केली.
बैठकीस संचालक शांताराम कोकाटे, लक्ष्मण शेळके, विनायक घुमरे, जगन्नाथ खैरनार, सुनील केकाण, सुनील घुमरे, संजय खैरनार, सुनील चकोर, संगीता काटे, सविता उगले, पंढरीनाथ खैरनार, सुनीता बोºहाडे, लता रुपवते, दत्तात्रय सानप, रवींद्र पगार, सचिव विजय विखे, आर. एन. जाधव, सहायक निवडणूक अधिकारी संजय गायकवाड यांच्यासह संचालक उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, विठ्ठल उगले, नगरसेवक मल्लू पाबळे, सुहास गोजरे, रामभाऊ लोणारे, पंकज जाधव, दिगंबर देशमुख, कचरू डावखरे आदी उपस्थित होते.