केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते सिंगल यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:27 AM2018-11-19T00:27:18+5:302018-11-19T00:48:46+5:30

फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन-२०१८ स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणारे शहराचे पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांचा नवी दिल्ली येथील एसएसजी जवानांच्या ‘प्रवाह-अ ट्रिबुट टू द २६/११’ या कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़

Singla felicitated at the hands of Union Home Minister | केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते सिंगल यांचा सत्कार

आयर्न मॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणारे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांचा सत्कार करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू़

googlenewsNext

नाशिक : फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन-२०१८ स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणारे शहराचे पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांचा नवी दिल्ली येथील एसएसजी जवानांच्या ‘प्रवाह-अ ट्रिबुट टू द २६/११’ या कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ यावेळी आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धेतही सिंगल यांनी सहभाग घेतला होत़
नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये रविवारी (दि़१८) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या कार्यक्रमात आयर्न मॅनची स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणारे पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल व राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांचा केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला़ यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मीनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आयटीबीटीचे डायरेक्टर जनरल एस़एस़ देसवाल यांच्या हस्ते डॉ़ सिंगल यांना पदक प्रदान करण्यात आले़
एनएसजी जवानांना प्रोत्साहित करण्यासाठी हाफ मॅरेथॉन, मिनी मॅरेथॉन, रन फॉर फनचे आयोजन करण्यात आले होते़ या स्पर्धेतील विजेत्यांना सिंगल व कृष्णप्रकाश यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Web Title: Singla felicitated at the hands of Union Home Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.