'Silent agitation' for women's safety '' Vadhi Mahila Congress: In front of the Collector's office, the dam | महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘मूक आंदोलन’ राष्टÑवादी महिला कॉँग्रेस : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

ठळक मुद्देतोंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन महिलांवर अत्याचार करू नका’ असे फलक हातात

नाशिक : शहरात महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्यायाच्या प्रमाणात वाढ झाल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाल्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मूक आंदोलन’ करण्यात आले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी तोंडाला काळ्या फिती बांधून सकाळी ११ वाजता आंदोलन केले. महिलांनी हातात ‘हिंसा नही सन्मान चाहिये, जीवन का आधार चाहिये’, लगातार बलात्कार... फडणवीस सरकार गुन्हगार..., हमे चाहिये सुरक्षा..., स्टॉप क्राइम आॅन वुमन... महिलांवर अत्याचार करू नका’ असे फलक हातात घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, पुष्पलता उदावंत, नीलिमा काळे, सायरा शेख, मेघा दराडे, पूनम गवळी, पूनम बर्वे, वंदना भामरे, अपर्णा देशमुख, मंगल भालेराव, सायरा शेख, नुरजहॉ मन्सुरी, नंदा वाघमारे, राणी काळशेकर आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या.


Web Title: 'Silent agitation' for women's safety '' Vadhi Mahila Congress: In front of the Collector's office, the dam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.