सोशल मीडियातून शांततेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 12:25am

नाशिक : हिंसाचाराचे प्रकार रोखण्यासाठी नेटिझन्सने सोशल मीडियातून महत्त्वाची भूमिका पार पाडली. राज्यभरात गेल्या तीन दिवसांपासून कलुषित झालेले वातावरण व जातीय तेढ कमी करण्यासाठी बुधवारी सोशल मीडियातून अनेकांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला, तर अनेकांनी इंग्रजांची ‘तोडा आणि राज्य करा’ या नीतीची आठवण करून देत जातिभेद निर्माण करणाºयांचे आत्मभान जागविण्याचा प्रयत्न केला.

नाशिक : हिंसाचाराचे प्रकार रोखण्यासाठी नेटिझन्सने सोशल मीडियातून महत्त्वाची भूमिका पार पाडली. राज्यभरात गेल्या तीन दिवसांपासून कलुषित झालेले वातावरण व जातीय तेढ कमी करण्यासाठी बुधवारी सोशल मीडियातून अनेकांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला, तर अनेकांनी इंग्रजांची ‘तोडा आणि राज्य करा’ या नीतीची आठवण करून देत जातिभेद निर्माण करणाºयांचे आत्मभान जागविण्याचा प्रयत्न केला. समाजात जातिभेद निर्माण करणाºयांचे आत्मभान जागविण्यासाठी नेटिझन्सनी बुधवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीची आठवण करून दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जीवनभर जातिभेद व सामाजिक रूढी-परंपरांना झुगारून महिला शिक्षणासाठी प्रयत्न केले. वंचित व दुर्लक्षित घटकांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह पोहोचविला. त्यांच्या जयंतीच्या दिवशीच शाळा बंद असल्याची आठवण करून देत जातीय तेढ संपविण्याचे आवाहन अनेकांनी सोशल मीडियातून केले, तर इंग्रजांनी भारतात जातिभेदाची बीजे पेरून सामाजिक तेढ निर्माण केली व तोडा व राज्य करा या नीतीने भारताला गुलाम बनविले. इंग्रजांनी केलेल्या जातीय भेदाभेदाच्या विषमय पेरणीचे परिणाम आजही देशाला भोगावे लागत आहेत. जातीय भेद व सामाजिक तेढ यामुळे कोणतीही जात विजयी होणार नाही, तर इंग्रज व त्यांची फोडाफोडीची रणनीतीच विजयी होईल, अशी चपराकही नेटिझन्सनी जातीय भेदाभेद पसरविणाºया समाजकंटकांना लगावली आहे. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचा सर्वांनीच आदर करून एकदिलाने नांदण्याचे आवाहनही सोशल मीडियातून अनेकांनी केले आहे, तर काहींनी केवळ शांतता राखा आपण सर्व एक आहोत, असे आवाहन करणारे संदेश सोशल मीडियातून व्हायरल केले.

संबंधित

शॉवरमध्ये विद्युतप्रवाह उतरल्याने नाशिकमध्ये डॉक्टरचा मृत्यू
ज्येष्ठ नागरिकांना निवडणुकीचे काम, सेवानिवृत्तांना संधी; अनोखा उपक्रम
अहमदनगरच्या बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांडाचा सोमवारी निकाल
बॉश स्पेअरपार्ट चोरीप्रकरणी नगरसेवकासह राजकारण्यांची चौकशी
मनोधैर्य योजनेनुसार पिडीत महिलांना आता दहा लाखांची मदत...

नाशिक कडून आणखी

खुनाचा उगलडा : प्रेयसीला ‘डिनर’ दिल्यानंतर प्रियकराने केला खून; मृतदेह गोणीत भरून फेकला बंधा-याच्या पाण्यात
नाशिक महापालिकेतील आॅटो डीसीआर प्रणालीत महिनाभरात सुधारणा
नाशकात स्मार्ट सिटी अंतर्गत गावठाणातील रस्ते विकासावर प्रश्नचिन्ह
सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थांना बंदी नाहीच
राज्य ग्राहक कल्याण समिती अध्यक्षांच्या बैठकीकडे अधिका-यांची पाठ

आणखी वाचा