एसवायबीएस्सीचा गणिताचा पेपर फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 01:21 AM2018-04-29T01:21:49+5:302018-04-29T01:21:49+5:30

देशभरातील सीबीएससीच्या दहावी आणि बारावीचे पेपर फुटीचे प्रकरण गाजत असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाही पेपरफुटीचे ग्रहण लागले आहे. सध्या पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयीन परीक्षा सुरू असून, विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षाचा ४० गुणांचा लिनियर अलजेब्रा (गणित) विषयाचा पेपर शनिवारी (दि. २८) फुटल्याचे समोर आले आहे.

SIBSE's math paper exploded | एसवायबीएस्सीचा गणिताचा पेपर फुटला

एसवायबीएस्सीचा गणिताचा पेपर फुटला

googlenewsNext

नाशिक : देशभरातील सीबीएससीच्या दहावी आणि बारावीचे पेपर फुटीचे प्रकरण गाजत असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाही पेपरफुटीचे ग्रहण लागले आहे. सध्या पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयीन परीक्षा सुरू असून, विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षाचा ४० गुणांचा लिनियर अलजेब्रा (गणित) विषयाचा पेपर शनिवारी (दि. २८) फुटल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली असून, ही समिती पेपरफुटीच्या प्रकरणाची दहा दिवसांत चौकशी करून विद्यापीठाला अहवाल सादर करणार आहे.  विज्ञान पदवी शाखेची द्वितीय वर्षाच्या लिनियर अलजेब्रा (गणित) विषयाचा शनिवारी दुपारी पेपर असताना या विषयाची प्रश्नपत्रिका शुक्रवारी रात्रीच सुमारे तीन हजार रु पयांचा व्यवहार होऊन फुटल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या पेपरफुटीच्या प्रकरणाबाबत विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ होते. मात्र आपच्या पदाधिकाºयांनी शनिवारी उपनगर पोलिसांच्या मदतीने बिटक ो महाविद्यालयाचे प्राचार्य राम कुलकर्णी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. आपच्या काही पदाधिकाºयांच्या हातात ही प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्यांनी सत्यता पडताळून पहाण्यासाठी साडेअकरा वाजेच्या सुमारास प्राचार्य राम कुलकर्णी यांच्याकडे याबाबत चौकशी केली. कुलकर्णी यांनी त्वरित या विषयाची प्रश्नपत्रिका पडताळून पाहिली असता व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका व विद्यार्थी सोडवित असलेली प्रश्नपत्रिका ही एकच असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपच्या पदाधिकाºयांनी प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय नको म्हणून नाशिक येथील पुणे विद्यापीठाच्या कार्यालयामध्ये जाऊन ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. प्रश्नपत्रिका फुटल्याचे शिक्षकांना माहिती झाल्यानंतर त्यांनीही पुणे विद्यापीठाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. सर्व गोंधळाच्या परिस्थितीत शहरातील विविध महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून हा पेपर सोडवून घेतला आहे. याप्रकरणी विद्यापीठ काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
दोषींवर कारवाई व्हावी
च्विज्ञान शाखा पदवीच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेदरम्यान शनिवारी (दि. २८) लिनियर अलजेब्रा (गणित) विषयाची प्रश्नपत्रिका शुक्रवारी रात्रीच सोशल मीडियावर व्हायरल झाली. व्हायरल झालेली प्रश्नपत्रिकाच शनिवारी विद्यार्थ्यांना परीक्षेला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी सिनेट सदस्य अमित पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरु ंना निवेदनाद्वारे केली आहे. विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयात हे निवेदन देण्यात आले. यावेळी आपचे जितेंद्र भावे, भाजपा युवा मोर्चाचे अजिंक्य गिते, आकाश तोरे, हितेश लहानगी, अक्षय नागरे आदी उपस्थित होते.
पुणे विद्यापीठाकडून परीक्षा सुरू होण्यापूर्वी अवघ्या दहा मिनिटे अगोदर सर्व महाविद्यालयांना नेटवरून प्रश्नपत्रिका दिल्या जातात. मात्र शनिवारी राज्यात सर्वत्र होणाºया लिनियर अलजेब्रा (गणित) या विषयाची प्रश्नपत्रिका शुक्र वारी रात्रीच ११ वाजेच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायलर झाली होती. त्यामुळे गैरप्रकार करणाºया विद्यार्थ्यांचे फावले असले तरी प्रामणिकपणे अभ्यास करून परीक्षेला सामोरे जाणाºया विद्यार्थ्यांवर मात्र अन्याय होणार आहे.

Web Title: SIBSE's math paper exploded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.