बँकिंग व्यवस्था पॅकेजमुळेच वाचली शिवप्र्रताप शुक्ल : बँक आॅफ महाराष्ट्र अधिकारी संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:40 AM2018-05-27T01:40:08+5:302018-05-27T01:40:08+5:30

नाशिक : आर्थिक गैरव्यवहार व एनपीएमुळे देशातील बँकिंग व्यवस्था अतिशय अडचणीत आली असून, वाढते एनपीएचे प्रमाण, नीरव मोदीसारख्यांकडून बँकांची झालेली फसवणूक यामुळे बँकांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे.

Shukla: Bank of Maharashtra Officers Association's Convention on Inauguration | बँकिंग व्यवस्था पॅकेजमुळेच वाचली शिवप्र्रताप शुक्ल : बँक आॅफ महाराष्ट्र अधिकारी संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन

बँकिंग व्यवस्था पॅकेजमुळेच वाचली शिवप्र्रताप शुक्ल : बँक आॅफ महाराष्ट्र अधिकारी संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन

Next
ठळक मुद्देतर देशातील बँकिंग व्यवस्था संपुष्टात आली असती पैसे सुरक्षित राहतीलच याबाबत बँकांचे ग्राहक साशंक

नाशिक : आर्थिक गैरव्यवहार व एनपीएमुळे देशातील बँकिंग व्यवस्था अतिशय अडचणीत आली असून, वाढते एनपीएचे प्रमाण, नीरव मोदीसारख्यांकडून बँकांची झालेली फसवणूक यामुळे बँकांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे. बँकिंग क्षेत्राला उभारी मिळावी याकरिता केंद्र सरकारने २ लाख ११ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. त्यामुळेच देशातील बँकिंग व्यवस्था वाचली असून जर सरकारने हे पाऊल उचलले नसते तर देशातील बँकिंग व्यवस्था संपुष्टात आली असती आणि सरकारलाही राजीनामा द्यावा लागला असता असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल यांनी केले.
आनंदवल्ली पाइप लाइनरोडवरील एका मंगल कार्यालयात बँक आॅफ महाराष्ट्र आॅफिसर्स आॅर्गनायझेशनच्या १९व्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या उदघाटन सोहळ्यात शनिवारी (दि.२६) ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लक्मा रेड्डी, सुधाकर कुलकर्णी, बाळासाहेब फडणवीस आदी उपस्थित होते.
शिवप्र्रताप शुक्ल म्हणाले, सरकारी बँकांचा देशातील बँकिंग क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे. पूर्वी बँकिंग व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये विश्वास होता. आज परिस्थिती बदलली असून खात्यावरचे पैसे सुरक्षित राहतीलच याबाबत बँकांचे ग्राहक साशंक आहेत. त्यामुळे या व्यवस्थेवरून बँकांचा विश्वास उडत चालला असून कर्जबुडव्यांमुळे एनपीए वाढले आहेत. नीरव मोदीसारख्यांकडून बँकांची फसवणूक झाल्यामुळे बँकिंग क्षेत्र अडचणीत असून ही व्यवस्था सावरण्यासाठीच केंद्र सरकारने २ लाख ११ हजार कोटींचे पॅकेज देऊ केल्याचे सांगतानाच पॅकेज दिले नसते तर बँक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असती असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता बँकांची जबाबदारी वाढली असून, स्पर्धेच्या युगाला तोंड देताना बँकांना आपली विश्वसनीयता पुन्हा निर्माण करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.
या अधिवेशनासाठी देशभरातून संघटनेचे १२०० प्रतिनिधी उपस्थित असून, या दोन दिवसीय अधिवेशनात कर्मचारी, अधिकारी यांचे वेतनकरार, राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाला विरोध, बँकांचे विलिनीकरण थांबवणे आणि दि. ३० व ३१ मे रोजीच्या संपाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
पीएनबी घोटाळ्याचे खापर ब्रँच अधिकाऱ्यावर
पंजाब नॅशनल बँके चा घोटाळा बँकेच्या ब्रँच अधिकाºयामुळे झाल्याचे सांगत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल यांनी घोटाळ्याचे खापर शाखेच्या व्यवस्थापकावर फोडले. प्रत्यक्षात गैरव्यवहार झाल्यानंतर तीन ते चार वर्षांनी समोर आला. त्यामळे वरिष्ठ अधिकाºयांसह सनदी लेखापाल व शासकीय यंत्रणांविषयीही साशंकता असताना शुक्ल यांनी अधिवेशनात या घोटाळ्यात पीएनबीच्या संबंधित शाखेच्या व्यवस्थापकामुळे हा घोटाळा झाल्याचे सांगितले.

Web Title: Shukla: Bank of Maharashtra Officers Association's Convention on Inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक