श्रीरंग भजनी मंडळ अव्वल, प्रश्नमंजूषा स्पर्धेस प्रतिसाद अहिराणी साहित्य संमेलनात भजनांचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:20 AM2017-12-30T01:20:51+5:302017-12-30T01:22:24+5:30

सिडको : ‘रामनाम हे सदा सुखाचे निधान जाणा परमेशाचे’, ‘अमृताची फळे अमृताची वेली तोचि पुढे चाली बिजाची ही’ या आणि अशा विविध भजनांचे सादरीकरण शुक्रवारी खान्देश महोत्सवात करण्यात आले.

Shrirang Bhajani Mandal tops, response to questions, competition, Aharon alarms in Ahirani Sahitya Sammelan | श्रीरंग भजनी मंडळ अव्वल, प्रश्नमंजूषा स्पर्धेस प्रतिसाद अहिराणी साहित्य संमेलनात भजनांचा गजर

श्रीरंग भजनी मंडळ अव्वल, प्रश्नमंजूषा स्पर्धेस प्रतिसाद अहिराणी साहित्य संमेलनात भजनांचा गजर

Next
ठळक मुद्देभजनी मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवलागायकांसह वादकही महिलाच

सिडको : ‘रामनाम हे सदा सुखाचे निधान जाणा परमेशाचे’, ‘अमृताची फळे अमृताची वेली तोचि पुढे चाली बिजाची ही’ या आणि अशा विविध भजनांचे सादरीकरण शुक्रवारी खान्देश महोत्सवात करण्यात आले.
खान्देशी महोत्सवात शुक्रवारी महिलांसाठी भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या भजन स्पर्धेसाठी १५ हून अधिक महिला भजनी मंडळांनी या स्पर्धेसाठी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. भजनी मंडळांच्या सदस्यांनी लाल, पिवळा, राखाडी, पांढरी
रंगांच्या एकसमान साड्या परिधान करून भजनसत्राला अनोखे स्वरूप दिले होते तसेच बहुतांश भजनी मंडळांत गायकांसह वादकही
महिलाच असल्याचे दिसून आले. या भजन स्पर्धेत श्रीरंग भजनी मंडळ (प्रथम), ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ (द्वितीय), गार्गी भजनी मंडळ (तृतीय) यांना अनुक्रमे दहा हजार, सात हजार आणि पाच हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. भजन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, आमदार देवयानी फ रांदे, नगरसेवक प्रतिभा पवार, कल्पना चुंभळे, पुष्पा भामरे आदी उपस्थित होते. या भजन स्पर्धेसाठी शास्त्रीय गायक आशिष रानडे आणि मृदुला देव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. शुक्रवारी आयोजित महोत्सवाच्या संध्याकाळच्या सत्रात महिलांसाठी ‘न्यू होम मिनिस्टर’या प्रश्नोत्तरावर आधारित मनोरंजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Shrirang Bhajani Mandal tops, response to questions, competition, Aharon alarms in Ahirani Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fairजत्रा