शिवराय, संभाजी राजांच्या जयघोषात शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:20 AM2019-01-21T01:20:06+5:302019-01-21T01:24:06+5:30

जय शिवाजी, जय भवानी, संभाजी महाराजांचा विजय असो, नरवीर तानाजी की जय अशा घोषणांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कवड्यांच्या माळांची शोभायात्रा काढण्यात आली.

Shobayatra in the joua of Shivrajaya, Sambhaji kings | शिवराय, संभाजी राजांच्या जयघोषात शोभायात्रा

शिवराय, संभाजी राजांच्या जयघोषात शोभायात्रा

Next

नाशिक : जय शिवाजी, जय भवानी, संभाजी महाराजांचा विजय असो, नरवीर तानाजी की जय अशा घोषणांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कवड्यांच्या माळांची शोभायात्रा काढण्यात आली.
ढोलपथक, भगवे झेंडे, झांज पथक, लेजीम पथक यातील वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
महाकवी कालिदास कलामंदिरात संस्कृती नाशिक संस्था व नाशिक महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘धगधगते शंभूपर्व’ या व्याख्यानमालेनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
गोदाघाटावरील रोकडोबा तालीम येथून निघालेल्या या शोभायात्रेत उंटवाडी माध्यमिक शाळेतील लेजीम आणि ढोलपथक अत्यंत उत्साहात सहभागी झाले होते. तसेच यशवंत व्यायामशाळेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब, रोप मल्लखांब, जिम्नॅस्टिक अशा अनेक चित्तवेधक कसरती करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.

Web Title: Shobayatra in the joua of Shivrajaya, Sambhaji kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.