‘गोदा फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ नाशिककरांनी रोवणे गरजेचे : शैलजा देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 07:54 PM2018-09-04T19:54:57+5:302018-09-04T19:58:11+5:30

नद्यांचा मुळ नैसर्गिक स्वभाव टिकवून ठेवत वसुंधरा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सहा राज्यांमधून प्रवास करणाऱ्या गोदावरीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 Shilja Deshpande: 'Goddess Festival' should be inaugurated by Nashik | ‘गोदा फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ नाशिककरांनी रोवणे गरजेचे : शैलजा देशपांडे

‘गोदा फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ नाशिककरांनी रोवणे गरजेचे : शैलजा देशपांडे

googlenewsNext
ठळक मुद्देमानवी हस्तक्षेपामुळे भारतातील नद्यांना गटारीचे स्वरुपउपनद्या ही गोदामाईची ताकदकिर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव

नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वतावरुन उगम पावणारी गोदावरी नदी भारतातील अत्यंत महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. दुर्दैवाने या नदीच्या उगमस्थानाजवळच धरणे बांधली गेली. त्यामुळे तीचा मूळ नैसर्गिक स्वभाव आणि रचना विस्कळीत झाली. गोदामाईला पुनर्जिवित करण्यासाठी ‘गोदा फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ नाशिककरांनी रोवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘जिवीत नदी’ संस्थेच्या संस्थापक शैलजा देशपांडे यांनी केले.

निमित्त होते, नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या उद्घाटनाचे. गुरूगोविंदसिंग महाविद्यालयात मंगळवारी (दि.४) दुपारी झालेल्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ‘नदी प्रदूषण : नागरिकांचा सहभाग’ या विषयावर देशपांडे यांनी या महोत्सवाच्या पहिल्या सत्राच्या व्याख्यानाचे पुष्प गुंफले. व्यासपिठावर परमिंदर सिंग, प्राचार्य निळकंठ निकम, किर्लोस्करचे मकरंद देवधर, महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव, किरण रहाळकर उपस्थित होते.

मानवी हस्तक्षेपामुळे भारतातील नव्हे तर जगभरातील नद्यांना गटारीचे स्वरुप प्राप्त होत आहे, याबाबत देशपांडे यांनी चर्चा केली. नाशिककरांनी गोदा फेस्टीव्हल’ची मुहूर्तमेढ रोवल्यास तरुणाई अधिकाधिक आकर्षित होईल. या फेस्टच्या माध्यमातून गोदावरी शिवार फेरी, विषारीद्रव्य मुक्त जीवनशैली, छायाचित्र प्रदर्शन, गोदा दत्तक उपक्रमाद्वारे पुरक अशी कृतीशील चळवळ उभी राहण्यास मदत होईल, असा विश्वास देशपांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

नद्यांचा मुळ नैसर्गिक स्वभाव टिकवून ठेवत वसुंधरा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सहा राज्यांमधून प्रवास करणाऱ्या गोदावरीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक नाशिककर दैनंदिन कामांमधून २२ ते ४० ग्रॅमपर्यंत केमिकल्सचा वापर दररोज करतो. त्यामुळे नदीपात्रात सांडपाण्याच्या माध्यमातून हजारो किलो विषारी द्रव्य दररोज मिसळतात, असे देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

उपनद्या ही गोदामाईची ताकद
गोदावरी नदीचे मुख्य वैशिष्टय आणि ताकद ही तीच्या उपनद्या आहेत. या नदीला मोठ्या संख्येने उपनद्या मिळतात. उगमापासून आळंदी उपनदी, नासर्डी, दारणा, बाणगंगा, प्रवरा, कादवा, मंजिरा, पुर्णा या मुख्य उपनद्या गोदावरीला थेट औरंगाबादपर्यंत येऊन मिळतात. यामुळे या नदीचा विस्तारदेखील मोठा असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. नदीची व्याख्याच प्रशासनाकडे नसल्यामुळे सगळे आराखडे, उपाययोजना केवळ कागदावरच राहतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Web Title:  Shilja Deshpande: 'Goddess Festival' should be inaugurated by Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.